आॅनलाईन लोकमतसातारा , दि. २0 : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जुन्या वाहनांसाठी ई लिलाव प्रक्रिया राबवूनही ती फोल ठरत असल्याने आता जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २८ जून रोजी जिल्हा परिषदेतील जुन्या वाहनांचा जाहीर लिलाव होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीमार्फत हा लिलाव करण्यात येणार आहे. यासाठी अनामत रक्कम ५ हजार रुपये इतकी आकारली जाणार आहे. महाराष्ट्रातील रहिवाशांना या लिलावात सहभाग घेता येणार आहे. गेल्या २0 ते २५ वर्षांपासूनची वाहने व इतर साहित्य जिल्हा परिषदेचे यांत्रिकी विभाग तसेच कोरेगाव रस्त्यावरील गोडावूनमध्ये पडून आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत गांभीयार्ने घेत यंत्रणेला जागृत केले आहे. २८ जून रोजी अ?ॅम्बेसिडर, जीप, बोलेरो अशी एकूण १९ वाहने लिलावात काढण्यात येणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष असणाऱ्या समितीच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, यापूर्वी २४ वाहनांचे लिलाव ई प्रक्रियेच्या माध्यमातून काढण्यात आले होते. पण त्याला प्रतिसादच मिळत नसल्याचे पुढे आले आहे. वाहनांची किंमत ३ लाखांच्या वर गेल्यास लिलाव प्रक्रिया ई निविदेच्या माध्यमातून राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र यात सहभागी असणाऱ्यांकडे वाहन विक्रीचा परवाना असणे आवश्यक असते. त्यातच प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी संबंधितांची ह्यडिजीटल सिग्नेचरह्ण सुध्दा आवश्यक असते. मात्र, जुन्या वाहनांच्या लिलावात सहभाग घेणारे व्यावसायिक मुख्यत: भंगार विक्रेतेच जास्त असतात. त्यामुळे या प्रक्रियेलाच खो बसल्याचे निदर्शनास आले आहे.
२५ वर्षांच्या भंगाराचाही लवकरच लिलाव
जिल्हा परिषदेतील जुन्या खुर्च्या, टेबल यांचे भंगार मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या २५ वर्षांत या साहित्याचा लिलावच झाला नाही. जिल्हा परिषदेचे आॅडिटोरिअम उभारण्याचे काम सुरु झाल्यानंतर भंगाराचे येथील गोडावून खावलीकडे हलविण्यात आले. त्याठिकाणी हे भंगार नेण्यात आले. या भंगाराच्या विक्रीतून जिल्हा परिषदेला फायदा होऊ शकतो. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सूचनेनुसार येत्या दहा दिवसांत याचाही लिलाव केला जाणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे अभियंता संजय पाटील यांनी लोकमतने दिली.मी पदभार स्विकारल्यापासून तीन ते चार वेळा जिल्हा परिषद मालकीच्या वाहनांचे ई लिलाव काढले. या प्रक्रियेत तीन वाहनांचे लिलाव झाले; परंतु फारसा प्रतिसाद मिळत नाही, हे लक्षात घेऊन आता जाहीर लिलाव प्रक्रिया राबविण्याचे निश्चित केले आहे. याला चांगला प्रतिसाद मिळू शकेल, अशी अपेक्षा आहे. - डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद