शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
2
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
5
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
6
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
7
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
8
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
9
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
10
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
11
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
12
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
13
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
14
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
15
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
17
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
18
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
19
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
20
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

ई-पीक पाहणी नोंद: सातारा जिल्ह्यात केवळ १० टक्के शेतकऱ्यांचीच नोंदणी; मदत कशी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 12:15 PM

खरीप हंगामातील ई-पीक पाहणी नोंद ही १५ ऑक्टोबरपर्यंतच करावी लागणार

नितीन काळेलसातारा : शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवीत असते, तसेच शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पेरा नोंदवावा लागतो. याची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत असली तरी आतापर्यंत १० टक्केच खातेदारांनी नोंद केली आहे. त्यामुळे नोंद न करणाऱ्यांना मदत कशी मिळणार, हा प्रश्न असून आता तीनच दिवस उरले आहेत.ई-पीक पाहणी नोंदीसाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती होण्यासाठी शासन विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. ॲपद्वारे पीक नोंदणी झाल्यास शेतकऱ्यांना मदत होते. ही नोंदणी शेतकऱ्यांनी स्वत:हून करायची आहे. यावर्षी खरीप हंगामातील ई-पीक ॲपद्वारे पेरा नोंदणीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत आहे. तरीही १० टक्क्यांपेक्षा कमीच खातेदारांनी नोंद केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ९० टक्के खातेदार अजूनही या नोंदणीच्या बाहेर आहेत. येत्या तीन दिवसांत किती खातेदार नोंदणी करणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

जिल्ह्यात १० लाखांवर खातेदारजिल्ह्यात एकूण १० लाख १५ हजार ६४९ खातेदार आहेत. १० ऑक्टोबरपर्यंत यामधील ८६ हजार ३८१ खातेदार शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाइल ॲपद्वारे केली आहे. याचे क्षेत्र ९७ हजार ९६३ हेक्टर आहे.

ई-पीक पेरणी तुम्ही कशी नोंदवाल...स्मार्ट मोबाइलद्वारे गुगल प्ले स्टोअरवरून ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करावे. यावर मोबाइल क्रमांकाची नोंद करावी. सात-बारामधील नावाप्रमाणे अचूकपणे नोंदणी करावी.

थेट लाभाच्या योजनेसाठी आवश्यक...ही नोंदणी थेट लाभाच्या योजनेसाठी आवश्यक आहे. अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई यासह अन्य योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंद करणे गरेजेचे आहे.

१५ ऑक्टोबरपर्यंत मुदत...खरीप हंगामातील ई-पीक पाहणी नोंद ही १५ ऑक्टोबरपर्यंतच करावी लागणार आहे. त्यानंतर याची नोंद होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नोंद न झाल्यास फायदा होणार आहे. त्यामुळे नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या हातात आता तीनच दिवस राहिले आहेत.

तांत्रिक समस्या...ई-पीक पाहणी नोंदणीसाठी मोबाइल कव्हरेज नाही. काही शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाइल नाही. यामुळे ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत.

सातारा तालुक्यात सर्वाधिक नोंद...जिल्ह्यात आतापर्यंत ८६ हजारांवर खातेदारांनी ई-पीक ॲपद्वारे नोंदणी केली आहे. यामध्ये सातारा तालुक्याचा प्रथम क्रमांक आहे. या तालुक्यातील सर्वाधिक २० हजार ३४१ खातेदारांनी नोंद केली आहे. यानंतर पाटण तालुक्यात १६ हजार ५६० खातेदारांनी नोंद केली आहे.महाबळेश्वर तालुक्यात फक्त ८९१

महाबळेश्वर तालुक्यात खातेदारांची संख्या २२ हजार ४३२ आहे, तर येथील फक्त ८९१ शेतकऱ्यांनीच ई-पीक नोंदणी केली आहे. महाबळेश्वर तालुका सर्वांत मागे आहे. यानंतर मागे राहण्यात माण आणि वाई तालुक्याचा क्रमांक लागतो.

खरीप हंगामातील ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पेरा नोंदविण्याची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत आहे. सर्व शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत नोंदणी करावी, तरच शेतकऱ्यांना नुकसान व इतरवेळी याचा फायदा होतो. - प्रशांत आवटे, उपजिल्हाधिकारी, महसूल

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी