शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

प्रत्येक गावात शिवरायांंची मूर्ती उभारणार

By admin | Published: February 15, 2015 12:56 AM

कऱ्हाडात हिंदू युवा मेळावा : हजारो तरुणांची उपस्थिती, तरुणींकडून दांडपट्ट्याचे प्रात्यक्षिक

कऱ्हाड : हिंदू एकता आंदोलनच्या वतीने येथील कृष्णामाई घाटावर आज (शनिवार) आयोजित करण्यात आलेल्या हिंदू युवा मेळाव्यास सायंकाळी उत्साहात प्रारंभ झाला. या मेळाव्यास हजारो तरुणांनी उपस्थिती लावली. भगवा झेंडा हाती घेऊन घाटावर उपस्थित झालेल्या तरुणांमुळे कृष्णा घाट भगवामय झाल्याचे पाहावयास मिळाले. दरम्यान, जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात छत्रपतींची मूर्ती उभारण्याचे काम हिंदू एकता येथून पुढे करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. मेळाव्यास भाग्यनगर हैद्राबाद येथील आमदार व गोरक्षा दलाचे प्रमुख ठाकूर राजसिंग-राजाभैय्या हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यावेळी खासदार संजय पाटील, शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई, हिंदू एकता आंदोलनाचे प्रांतिक अध्यक्ष विनायक पावसकर व हिंंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे उपस्थित होते. सुरुवातीस आमदार शंभूराज देसाई यांचे भाषण झाले. ते म्हणाले, ‘कऱ्हाडमध्ये आयोजित या मेळाव्यामुळे युवकांमध्ये जिद्द व प्रेरणा निर्माण होणार आहे. या मेळाव्यातून प्रेरणा घेऊन युवकांनी वाटचाल करावी. छत्रपती शिवरायांचे कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. ’ हिंदू एकताचे कऱ्हाड दक्षिण अध्यक्ष भूषण जगताप म्हणाले, ‘१९६८ पासून हिंदू एकता सामाजिक काम करीत आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात छत्रपतींची मूर्ती उभारण्याचे काम हिंदू एकता येथून पुढे करणार आहे. युवकांनी त्याला पाठबळ द्यावे.’ दरम्यान, यावेळी दांडपट्ट्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यामध्ये मुलींनीही सहभाग घेतला होता. कऱ्हाडातील पाच मुलींनी दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके सादर केली. युवकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रात्यक्षिकांना दाद दिली. तसेच एका युवकाने कुऱ्हाडीच्या साहाय्याने डोक्यावर नारळ फोडून दाखविला. त्यालाही उपस्थितांनी दाद दिली. (प्रतिनिधी)