पाटण : कोयना धरण परिसरात बुधवारी सायंकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर ४.४ तीव्रतेची नोंद झाली. २० सेकंद बसलेल्या या भूकंपाने कोयना धरणासह सातारा, कऱ्हाड, चिपळूण, कोल्हापूर, सांगली जिल्हा हादरला आहे.याबाबत माहिती अशी की, कोयना धरणाच्या भिंतीपासून ११.२ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोषटवाडीच्या आग्नेयेला सहा किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. त्याची खोली नऊ किलोमीटर होती. कोयना धरण सुरक्षित असून धक्का बसल्यानंतर पाटण तालुक्यातील लोक घरातून बाहेर रिकाम्या जागेत पळत आले. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. (प्रतिनिधी)पावसाळी वातावरणकोयना परिसरात बुधवारी रात्री ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. वादळी वारे वाहत होते. त्यामुळे दुर्गम भागात संपर्क होत नव्हता.भूकंपाचा धक्का मोठा असल्याने त्या परिसरात नुकसानाची माहिती घेण्याचे काम जिल्हा प्रशासन करत होते.
भूकंपाने पश्चिम महाराष्ट्रासह कोकण हादरला
By admin | Published: May 18, 2016 10:39 PM