सातारा : कोयना परिसरामध्ये शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. ३.१ रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता मोजली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात जावळे गावच्या दक्षिणेला ४ किलोमीटर अंतरावर नोंदवला गेला आहे. कोयनेपासून हे अंतर २० किलोमीटर इतके दूर आहे. भूकंपाच्या केंद्रबिंदूची खाेली ७ किलोमीटर इतकी नोंदली गेली. या भूकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही.
कोयना परिसरात भूकंपाचा धक्का; ३.१ रिश्टर स्केल इतकी तीव्रता, कोणतीही हानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 9:45 PM