कोयनानगर : कोयना, पाटण परिसर आज, शनिवार, (दि.८) रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास भूकंपाच्या सौम्य धक्याने हादरला. याची तिव्रता २.९ रिश्टर स्केल नोंदविली गेली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.याबाबाबत माहिती अशी की, कोयना धरण परिसरात शनिवारी दुपारी २ वाजून १४ मिनिटांनी भुकंपाच्या सौम्य धक्का जाणवला. यामुळे कोयना, पाटण परिसर हादरून गेला. कोयना येथील भूकंपमापन केंद्रावर या धक्क्याची नोंद झाली असून तीव्रता २.९ रिश्टर स्केल इतकी नोंदविली गेली.भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून आठ किलोमीटर अंतरावर हेळवाक गावाच्या नैॠत दिशेस सहा किलोमीटर अंतरावर होता. त्याची खोली चार किलोमीटर होती. जमीन व घर थरथरल्याने लोक भीतीने घराबाहेर पडले.दरम्यान, भुकंपाचा या धक्क्याने कोयना धरण सुरक्षित असुन कोणतीही वित्तहानी झाली नाही अशी माहिती कोयना सिंचन विभागाने दिली.खड्ड्यांमुळे रोज हादरे...गुहागर-विजयपूर महामार्गावरील येराड ते संगमनगर मार्गादरम्यान खड्ड्यामुळे घरांना अवजड वाहनांमुळे मिनिटा मिनिटाला धक्के सहन करावे लागत आहेत. त्यामुळे आजच्या भुकंपाचा धक्का जाणवलाच नाही अशी प्रतिक्रिया गावातील ग्रामस्थांनी दिली.
कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2022 3:53 PM