फलटण : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रस्थान सोहळ्या दिनी माऊली फाऊंडेशनच्यावतीने वसुंधरा संवर्धन आणि हरितवारी या उपक्रमांतर्गत मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे पर्यावरणपूरक रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
मुधोजी महाविद्यालयाचे नवनियुक्त प्रभारी प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम, माऊलीचे सेवेकरी दीपक फरांदे, माजी प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, मुंबई उच्च न्यायालयातील ॲड. विश्वनाथ टाळकुटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुधोजी कॉलेज परिसर हरित करण्यासाठी विशेष कष्ट घेणारे डॉ. सुधीर इंगळे, प्रा. सतीश पवार आणि झाडांची जोपासना करणारे वनपाल आणि कर्मचाऱ्यांचाही निसर्गप्रेमी म्हणून सत्कार करण्यात आला.
मागील चार वर्षांत आषाढीवारी दरम्यान माऊली फाऊंडेशनमार्फत लावलेल्या पन्नासहून अधिक वृक्षांची उत्तम जोपासना महाविद्यालयातील कर्मचारी आणि विद्याथी यांनी केली आहे. ते पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाला नीलेश गनबोटे, अभिजित माळवदे, नामदेव शिंदे, राहुल कर्णे, प्रशांत धनवडे, प्रा. मनीष निंबाळकर, डॉ. गणेश शिंदे, जावेद शेख, विशाल मोहाटकर, राहुल सतुटे, हेमंत भोई, विलास जाधव, वीरेन सटाले यांनी वृक्षारोपण केले. विश्वनाथ टाळकुटे यांनी प्रास्तविक केले तर राहुल कर्णे यांनी आभार मानले.
फोटो
०३फलटण
फलटण येथे प्राचार्य पंढरीनाथ कदम, दीपक फरांदे यांच्या हस्ते पर्यावरणपूरक रोपांचे रोपण करण्यात आले. (छाया : नसीर शिकलगार)