शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत; एक्स्प्रेस गाड्याही रखडल्या!
2
दिल्लीत चार मजली इमारत कोसळली, ४ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले
3
Video: धक्कादायक! जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
4
चीन सोबत डील, पॉलिसीमध्ये बदल; ट्रम्प यांनी हार मानली का? अचानक का बदलले त्यांचे सूर
5
करण जोहर दिवसेंदिवस होत चाललाय बारीक, अवस्था पाहून चाहते चिंतेत, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाला…
6
मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून...; मंत्र्यांचा दावा खोडत धनंजय मुंडेंनी प्रकृतीबाबत केला खुलासा
7
जगभर: मोकळा आणि प्रदूषणमुक्त श्वास, पॅरिसमधले ५०० रस्ते फक्त चालण्यासाठी!
8
अमेरिकेत भारतीय विद्यार्थी सरकारच्या टार्गेटवर, व्हिसा रद्द झालेल्या जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये ५० टक्के भारतीय
9
World Press Photo of the Year: आई, आता मी तुला मिठी कशी मारू?
10
हृदयद्रावक! ऑटोतून आईसोबत खाली उतरला अन ट्रकने चिमुकल्याला चिरडले; घटनेनंतर तणावाचे वातावरण
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२५: आजचा दिवस आनंदात जाईल, प्रत्येक कामात यश मिळेल
12
भारताला जपानकडून मिळणार २ मोफत बुलेट ट्रेन; अवघ्या १ तासात ३२० किमी अंतर गाठणार!
13
अग्रलेख: वक्फ कायद्याला झटका, ...तर नव्या कायद्याचा उद्देशच नष्ट होईल
14
राज्यातील कृषी विभागातील बहुतेक बदल्या आता मंत्रीमुक्त, आता बदल्यांचे अधिकार कोणाला?
15
टॅरिफ युद्धात सोन्याचा निर्विवाद विजय! मौल्यवान धातूचा भाव एक लाखाच्या उंबरठ्यावर, सोन्याची आयात तब्बल १९२ टक्क्यांनी वाढली
16
सोयाबीन खरेदीचा ‘एमपी पॅटर्न’, २४ तासांत हातात पैसे; अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन
17
‘भगवद्गीता’ची हस्तलिखितांचा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश
18
टॅरिफने अर्थव्यवस्था कमकुवत, महागाई वाढेल, पण मंदी नाही : जॉर्जीव्हा
19
विशेष लेख: डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारयुद्धाचे भारताला किती चटके?
20
नाशिक दर्ग्याचे पाडकाम प्रकरण : महापालिकेच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

‘अमृत’च्या विविध योजनांचा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा - अस्मिता बाजी

By प्रगती पाटील | Updated: January 15, 2024 17:12 IST

सातारा : जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी ‘अमृत’ या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. या ...

सातारा : जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी ‘अमृत’ या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन अमृतच्या संचालिका तथा विभागीय पालक अधिकारी अस्मिता बाजी यांनी केले.सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्या बाजी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘राज्यातील खुल्या प्रवर्गातील परंतु ज्या अर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना शासनाच्या इतर कोणत्याही विभाग, महामंडळ, संस्था यांच्याकडून लाभ मिळत नाही. अशा अर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे) या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. अमृतच्या विविध योजनांचा प्रसार, प्रचार करणे व लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा मेळावा येथे घेण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(एमपीएससी) राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेवारांना अर्थसहाय्य देणे, संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देणे, अर्थिक विकासाकरीता स्वयम रोजगार प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम राबवून स्वावलंबी बनविणे, याच बरोबर कृषी उत्पन्न आधारित उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देणे, कौशल्यविकास प्रशिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधने इत्यादी योजना ‘अमृत’ मार्फत रबिवल्या जात आहेत, असे सांगून त्यांनी या योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हा समन्वयक अधिकारी महेश कोरडे, सातारा तालुका समन्वयक प्रमोद पंचपोर, कोरेगाव तालुका समन्वयक जीवन जाधव, वाई तालुका समन्वयक प्रशांत सुतार, फलटण, बारामती, माळशिरस समन्वयक आनंद इनामदार तसेच जिल्ह्यातील विविध भागातून लाभार्थी उपस्थित होते. याच बरोबर सायली मुतालिक, विराज कुलकर्णी, अॅड. सन्मान आयाचित, रोहित साने आदी मान्यवरांनी उपस्थिती होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर