शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

साताऱ्यात डेंग्यूचे आठ रुग्ण, सतर्कता बाळगण्याचे आवाहन : हिवताप विभागाकडून सर्वेक्षण

By सचिन काकडे | Published: June 20, 2024 10:02 PM

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया असे आजार डोके वर काढतात.

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा शहरात डेंग्यू बाधितांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली असून सध्या आठ बाधितांवर शहरातील विविध खाजगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. साथरोगांच्या पार्श्वभूमीवर हिवताप विभागाने विशेष खबरदारी म्हणून शहरात गृहभेटीद्वारे डेंग्यू अळ्यांचा शोध घेऊन त्या नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया असे आजार डोके वर काढतात. यंदादेखील मान्सूनला सुरुवात होताच कोरेगाव व सातारा तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सध्या सातारा शहरात डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या आठवर पोहोचली असून, या रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. हिवताप विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून सातारा शहरात गृहभेटीद्वारे सर्वेक्षण सुरू केले आहे. या कामी आशासेविका व आरोग्यसेविकांच्या तीन पथकांनी नेमणूक करण्यात आली असून, या पथकांद्वारे दररोज ३०० घरांना भेटी देऊन नागरिकांच्या आरोग्याच्या नोंदी घेणे, घरातील पाण्याच्या कंटेनरची तपासणी करून डेंग्यू अळ्यांचा शोध घेणे, डेंग्यू अळ्या आढळून आल्यास कंटेनर मोकळे करून अळ्या नष्ट करणे, ॲबेटिंग करणे अशी कामे गतीने केली जात आहे. या पथकांनी शहरातील सदर बझार, लक्ष्मीटेकडी, मतकर झोपडपट्टीकडे विशेष लक्ष दिले असून, येथे तपासणी मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे.

८४ प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीआरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील ८४ प्राथमिक आरोग्य केंद्रात डेंग्यू तपासणीची मोफत व्यवस्था उपलब्ध केली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना सांधेदुखी, ताप, कणकणी, अशक्तपणा असा त्रास जाणवत आहे, त्यांनी आजार अंगावर न काढता तातडीने डेंग्यूची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा हिवताप विभागाकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :dengueडेंग्यू