लोणंद : पालखी आगमन, मुक्कामाच्या ठिकाणी व पालखी सोहळ्यामध्ये गर्दीच्या ठिकाणी गुन्हेगार व समाजकंटकांवर आठ ड्रोन कॅमेरेने नजर ठेवता येणार आहे. तसेच महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर नियंत्रणासाठी सरकारी सीसीटीव्ही कॅमेरे ठिकठिकाणी लावले आहेत.पालखी सोहळ्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर व पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण सातारा जिल्ह्यातील एक अप्पर पोलीस अधीक्षक, ५ डीवायपासपी, १० पोलीस निरीक्षक, ५५ सहायक पोलीस निरीक्षक/ पोलीस उपनिरीक्षक, ६८० पोलीस जवान, १०० पोलीस हवालदार, ११४ वाहतूक पोलीस कर्मचारी असे एकूण ९६२ पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच ६०० पुरुष होमगार्ड, १०० महिला होमगार्ड असे एकूण ७०० होमगार्ड, ०१ एसआरपीएफ कंपनी पाळखी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी नेमण्यात आली आहे. तसेच खासगी वेशात ५ अधिकारी व ५० पोलीस जवान तैनात करण्यात आले आहेत. ही पथके चोºया, चेनस्नॅचिंग रोखण्यासाठी मदत करणार आहेत. पालखी तळावर वॉच टॉवर लावण्यात येणार असून, रात्रंदिवस एसआरपीएफ, आरसीपी व क्यूआरटीची पथके नेमण्यात आली आहेत.
पालखी सोहळ्यावर आठ ड्रोन कॅमेऱ्यांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 11:26 PM