कºहाड : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली. जेणेकरून त्यास मोफत प्रवास करता येऊ शकेल. मात्र, या योजनेची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी बनली आहे. येथील बसस्थानकात कार्यान्वित केलेल्या योजनेच्या विभागातील इंटरनेट सेवा खंडित असल्याने कार्ड काढण्याची सुविधा बंद ठेवली आहे. त्यामुळे योजनेच्या लाभासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असून, स्मार्टकार्ड योजना नको रे बाबा, अशा संतप्त प्रतिक्रिया त्यातून दिल्या जात आहेत.
कºहाड येथील बसस्थानक या ना त्या कारणांनी नेहमीच चर्चेत असते. सर्व सुविधांनीयुक्त अशा बसस्थानकात प्रवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. सोमवारी येथील बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. स्मार्ट कार्ड योजनेच्या लाभासाठी बसस्थानकात सुमारे पन्नासहून अधिक ज्येष्ठ नागरिक आले. मात्र, स्मार्ट योजनेची खिडकी बंद ठेवण्यात आली होती. तसेच इंटरनेट सेवा बंद आहे, असा फलक लावल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत तसेच बसावे लागले. लांबून आलेल्या साठ ते सत्तर वर्षीय वयोवृद्धांतून या योजनेची बसस्थानक प्रशासनाकडून अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला गेला.
योजनेअंतर्गत स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना नावनोंदणी बसस्थानकातील आरक्षण खिडकीच बंद ठेवल्यामुळे काहीच करता आले नाही. नावनोंदणीवेळी स्मार्ट कार्डसाठी ५५ रुपये शुल्क आकारले जाते म्हणून स्वत:कडील मतदार ओळखपत्र व आधार कार्ड दाखवून अनेक ज्येष्ठ नागरिक एसटी बसचे अर्धे तिकीट काढून कºहाडला आले होते. सकाळी अकरा ते बारा यादरम्यान आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी दुपारी दोन वाजेपर्यंत वाट पाहिली. मात्र, खिडकी बंद ठेवल्यामुळे त्यांना काहीच करता आले. कार्ड न काढता रिकाम्या हातांनी घरी परत जावे लागले.आरक्षित खिडकी बंद; ज्येष्ठ नागरिकांचे हालकºहाड येथील हायटेक बसस्थानकात येणाºया ज्येष्ठ नागरिकांचे सोमवारी चांगलेच हाल झाले. बसस्थानकात सोमवारी सकाळी स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्यात येणारी आरक्षण खिडकी बंद ठेवण्यात आली होती. तसेच त्यावर इंटरनेट सेवा बंद आहे, असा बोर्ड लावला होता, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कार्ड न काढता परत रिकाम्या हाताने घरी जावे लागले.
अंमलबजावणीच्या दुर्लक्षाचा साक्षात्कारएसटी महामंडळातर्फे विद्यार्थी, विद्यार्थिनी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी मोफत प्रवासाच्या योजना सुरू केल्या आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष बसस्थानकातील प्रशासनाकडून किती गांभीर्यपूर्वक केली जाते, याची माहिती कºहाड येथील बसस्थानकात सोमवारी घडलेल्या प्रकारामुळे ज्येष्ठ नागरिकांना आली. तसेच अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणाचा साक्षात्कारही झाला.