रहिमतपूर : कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या धामणेर, तारगाव, किरोली या मोठ्या गावांच्या निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत. दरम्यान, बैलाच्या अंगावर उमेदवारांनी चिन्हे काढून प्रचाराची नामी शक्कल लढवली आहे.दक्षिण कोरेगावमध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद आहे. त्यामुळे सध्या ग्रामपंचायत स्तरावर होण्याऱ्या निवडणुकात राजकीय पक्षांचा रंग दिसू लागला आहे. तसेच आजपर्यंत राजकीय नेत्याचे फोटो बॅनरवर दिसले नव्हते; परंतु आता बॅनरवर फोटोही दिसत आहेत. मते वळविण्यासाठी आमिषे सुद्धा दाखविली जात आहेत. सध्या पावसाने ओढ दिल्यामुळे शेतीमध्ये कामे कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा लक्ष घातलेले दिसत आहे. बेंदूर या सणादिवशी चक्क बैल रंगवताना उमेदवारांची चिन्हे काढली असून, त्यामाध्यमातून सुद्धा प्रचार केलेला दिसत आहे. काही पॅनेलने तर व्हॉट्सअॅपवर ग्रुप कसरून पॅनेलचे महत्त्व, विकासाची दिशा मतदारपर्यंत पोहोचविण्याची नामी शक्कल लढवली आहे.कोरेगाव तालुक्यातील धामणेर, तारगाव, किरोली, साप, वेळू येथील लढती रंगतदार होणार आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस व शेतकरी संघटना अशा पक्षांनी निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. (वार्ताहर)लक्ष वेधले...कोरेगाव तालुक्यातील धामणेर ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. त्यासाठी दि. ४ आॅगस्ट रोजी मतदान होत आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बेंदूर सण आला आहे. त्यामुळे अनेकांनी बैलांना रंगवतानाच त्यांच्या पोटावर निवडणुकीत मिळालेली चिन्हे काढली आहेत. येथील अनेक बैलांवर अशी चिन्हे दिसून येत आहेत.प्रचाराची ही एक नामी शक्कल आहे.
बैलांच्या अंगावर निवडणूक चिन्हे...
By admin | Published: July 29, 2015 9:34 PM