शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

कऱ्हाड तालुक्यातील 'गोंदी'त गुण्यागोविंदाने नांदतेय राजकारण!, सरपंचपद खुले असूनही निवड केली बिनविरोध

By प्रमोद सुकरे | Published: December 10, 2022 7:02 PM

वीस वर्षांपूर्वी झाली होती बिनविरोध निवडणूक 

प्रमोद सुकरेकऱ्हाड : थेट सरपंच निवडणुकीमुळे यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत भलतीच रंगत आली आहे. ज्या गावात सरपंच पद खुले आहे तेथे तर अटितटीची लढत पाहायला मिळतेय. या साऱ्याला छेद देत कऱ्हाड तालुक्यातील गोंदी गावात मात्र राजकारण गुण्यागोविंदाने नांदताना पाहायला मिळाले. सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव असतानाही २० वर्षानंतर पुन्हा एकदा या गावची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यांचे कौतुक तर सगळीकडे होणारच!कराड तालुक्यातील गोंदी ची  बागायतदारांचे गाव म्हणून ओळख आहे. त्यामुळे येथे आर्थिक सुबत्ता चांगलीच आहे. तसेच राजकीय दृष्ट्याही हे गाव तितकेच संवेदनशील आहे. म्हणून तर या गावातील लोकांनी आजवर पंचायत समिती, कृष्णा सहकारी साखर कारखाना, कृष्णा सहकारी बँक, कृष्णा कृषी उद्योग संघ,कराड तालुका खरेदी विक्री संघ, कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समिती आदी ठिकाणी प्रतिनिधित्व केले आहे तर आजही काहीजण करीत आहेत.सुमारे अडीच ते तीन हजार लोकसंख्या असलेले गोंदी हे गाव आहे. ऊसाच्या शेतीमुळे येथे आर्थिक समृद्धी चांगलीच आहे. त्याचबरोबर राजकारणही तेवढेच समृद्ध असल्याची प्रचिती बिनविरोध निवडणुकीमुळे आली आहे. भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले,काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण,अँड. उदयसिंह पाटील - उंडाळकर,राष्ट्रवादीचे नेते, कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते या सगळ्यांचे समर्थक या गावात आहेत.त्यातच सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी पडल्याने या गावची निवडणूकही अटितटीची होईल अशी चर्चा होती. मात्र ऊसाबरोबर इंद्रायणी तांदळाचे उत्पादन घेणाऱ्या या गावात यावेळी इंद्रायणीचाच सुवास पसरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोधचा डंका पाहिला मिळाला. खरंतर ही बाब इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी, आणि अनुकरणीय आहे.

वीस वर्षांपूर्वी झाली होती बिनविरोध निवडणूक गोंदी गावची निवडणूक २० वर्षांपूर्वी अशीच एकदा बिनविरोध झाली होती. त्यावेळी दिवंगत तानाजी पवार हे बिनविरोध सरपंच झाले होते. त्यावेळी देखील गोंदी ची निवडणूक बिनविरोध कशी काय झाली? याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. पण पुन्हा एकदा ग्रामस्थांनी एकजूट दाखवून बिनविरोध ग्रामपंचायत करण्याचा नवा इतिहास रचला आहे.असे आहेत नवे शिलेदारसरपंच- सुबराव पवारसदस्य- शरद पवार ,वैशाली यादव, वनिता पवार, रमेश पवार, अरुणा माने, अजित कुंभार ,रमेश पवार, जयाताई मदने, प्रज्ञा बनसोडे

ग्रामस्थांनी मोठ्या विश्वासाने आम्हाला बिनविरोध निवडून दिले आहे .याची आम्हाला जाणीव आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता सर्वांना बरोबर घेऊन आदर्श कारभार करण्याचा आमचा प्रयत्न राहील. - सुबराव पवार, सरपंच गोंदी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकKaradकराड