शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

मुंबईतील निवडणुकीआधी सरकार अल्पमतात!

By admin | Published: February 21, 2016 12:51 AM

पृथ्वीराज चव्हाण : साताऱ्यात वर्तविले भाकित; भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वकांक्षा

सातारा : ‘मुंबई महानगरपालिकेची सत्ता ताब्यात आल्याखेरीज राज्यावर पकड मिळणार नाही, ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वकांक्षा आहे. त्यामुळे या निवडणुकीआधी सरकार अल्पमतात जाईल,’ असे भाकित माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केले. आ. चव्हाण म्हणाले, ‘निवडणूक काळात अव्वा-सव्वा आश्वासने देऊन सत्तेवर आलेले भाजप, शिवसेना व मित्र पक्षांचे सरकार अत्यंत तकलादू स्वरूपाचे आहे. या सरकारमध्ये कुणाचा कुणाला पाय-पोस राहिलेला नाही. मुख्यमंत्रीच अधिकारी व सहकारी मंत्री ऐकत नसल्याचे कबूल करतायत. वेळोवेळी तोंडघशी पडण्याची वेळ त्यांच्यावर येत असते. अत्यंत हास्यास्पद पद्धतीने राज्याचे कामकाज सद्यघडीला सुरू आहे. त्यातच भाजपचे वरिष्ठ नेतेमंडळी मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळविण्याची महत्त्वकांक्षा बाळगून आहेत. यामुळे शिवसेना-भाजप या दोन पक्षांमध्ये अल्पावधीत तेढ निर्माण होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी हे सरकार अल्पमतात जाईल.‘ ‘राज्यात भयंकर दुष्काळ पडला असताना सरकार उपाययोजना करण्याऐवजी महंमद तुघलकी निर्णय घेताना पाहायला मिळत आहे. दुष्काळाचे गांभीर्य सरकारला राहिलेले नाही. कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी दुष्काळी भागात जनावरांच्या छावण्या बंद करण्याची घोषणा केली, मुख्यमंत्र्यांनाही या घोषणेबाबत कल्पना नव्हती. राज्यभरातून टीका होऊ लागल्यानंतर खडसेंना यू-टर्न घ्यावा लागला,’ अशी टीकाही आ. चव्हाण यांनी केली. लातूर शहरातही सध्या २५ दिवसांतून एकदा पाणी येते. रेल्वेने पाणी आणून लोकांची तहान भागवू, अशी घोषणा शासनाने केली होती. ती हवेत विरली आहे. शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. राज्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमधील ६० ते ७० हजार जागा रिकाम्या राहिल्या आहेत. या महाविद्यालयांतून तयार होणाऱ्या अभियंत्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुमार दर्जाची असल्याने त्यांना कामावर घेतल्यावर सहा महिन्यांचे पुन्हा ट्रेनिंग द्यावे लागते, असा आरोप उद्योजक करत आहेत. केंद्र सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची गळचेपी करत आहे. अफजल गुरुला फाशी दिली तर भाजपचा काश्मीरमधील मित्रपक्ष त्याला हुतात्मा म्हणतो तर मत व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी देशद्रोहासारखे खोटे खटले दाखल केले जातात, असा दांभिकपणा सरकारकडून सुरू आहे. साताऱ्यातील या पत्रकार परिषदेला काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील, सातारा पालिकेचे आरोग्य सभापती रवींद्र झुटिंग यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)