मसूर : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौउते चक्रीवादळाचा फटका मसूर, हेळगाव परिसराला बसला आहे. परिसरात हेळगाव, कालगाव, कवठे, खराडे येथे विजेच्या तारा तुटल्या. चिंचणी येथे घराच्या भिंतीशेजारी झाड मोडून पडले व गावाशेजारी शेतात एक झाड मुळासकट उन्मळून पडले. हेळगाव येथे दुकान गाळयावरील पत्रा उडून गेला. याचबरोबर आडचाली ऊस आडवे झाले आहेत. वांगी, टोमॅटो, गवार, भेंडी आदींसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
परिसरात अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या विद्युत वाहक तारेवर पडल्याने तारा तुटल्या होत्या. त्यामुळे वीजप्रवाह खंडित झाला होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला होता. तर वीज नसल्याने मोबाइल, टीव्ही आदी मनोरंजनाची साधने बंद होती. तसेच वीज नसल्याने पंखाही लावता येत नव्हता. मच्छरांचा त्रास सहन करावा लागला. खरीपपूर्व मशागतीसाठी हा पाऊस चांगला असला तरी या पावसाने परिसरात मोठे नुकसान झाले. दोन दिवस जोराचे वारे व पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटून जमिनीवर पडल्या होत्या. प्रसंगावधान राखून विजेचा प्रवाह बंद केल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही; परंतु वीज नसल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागली.
चौकट
या विभागाचे वीज वितरणचे अभियंता ॠषिकेश माळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन संकपाळ, नितीन मांढरे, विक्रम पोळ, अशोक चव्हाण, शीतल निकम, संजय चव्हाण, भूषण कुर्लेकर, विक्रम जाधव, प्रदीप पाटील यांनी पाऊस, वाऱ्याची तमा न बाळगता दोन दिवस अहोरात्र परिश्रम घेतले. या विभागाचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली.
फोटो आहे
फोटो कॅप्श्न-1) चिंचणी येथे घराशेजारी पडलेले झाड.
2) तुटलेल्या विजेच्या तारा जोडताना वीज वितरणचे कर्मचारी.