भुर्इंज : किसन वीर सहकारी साखर कारखान्यातील यशवंतराव चव्हाण सहवीज निर्मिती प्रकल्पातून गेल्या तीन हंगामातील वीज उत्पादनाचा विक्रम मोडत २०१४-१५ हंगामात उच्चांकी १० कोटी ५५ लाख युनिट वीजेची निर्मिती झाली. कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन अनिल शिंदे, चंद्रहास पाटील, विराज शिंदे, कारखान्याचे एन. बी. पाटील, ए. एस. साळुंखे यांच्या हस्ते आणि कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत टबाईनचे पुजन करून वीज निर्मिती प्रकल्पाच्या यंदाच्या हंगामाची सांगता झाली. २०१४-१५ मध्ये हा प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालविण्यात येऊन गेल्या तीन हंगामाच्या तुलनेत यंदाच्या २०१४-१५ हंगामात २४५ दिवसात विक्रमी १० कोटी ५५ लाख युनिट वीजेची निर्मिती झालेली आहे. ७ कोटी ३५ लाख ६१ हजार युनिट वीजेची म्हणजे सुमारे ४५ कोटी रूपयांची वीज महावितरणला निर्यात करण्यात आलेली आहे. उर्वरित २ कोटी २५ लाख युनिट वीज साखर कारखान्यासाठी तर ९६ लाख ३७ हजार युनिट वीज सहवीज निर्मिती प्रकल्पासाठी वापरण्यात आलेली आहे. सुमारे ११५ कोटी रूपये खर्चाच्या महत्वकांक्षी २२ मेगावॅट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची सन २०११-१२ मधील हंगामात यशस्वी चाचणी झाल्यानंतर सन २०१२-१३ व २०१३-१४ च्या हंगामात हा प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालविण्यात आला. को-जन प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांघिक कामगिरीबद्दल व्यवस्थापनाने आनंद व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी नंदकुमार निकम, नवनाथ केंजळे, एस. बी. सिंदकर, डी. आर. वाघोले, संदिप सूर्यवंशी, सुभाष घाडगे, शेखर भोसले-पाटील, सुनिल शिवथरे, दादासाहेब शिंदे, एस. एच. पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
आठ महिन्यात साडेदहा कोटी युनिट वीजनिर्मिती
By admin | Published: July 14, 2015 12:22 AM