शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

जिल्ह्यातील अकरा कारखान्यांचा ‘पट्टा पडला’

By admin | Published: June 02, 2015 12:30 AM

‘सह्याद्री’ सहा जूनपर्यंत चालणार : ७५ लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप; ८८ लाख क्विंटल साखरेची निर्मिती

वाठार स्टेशन : सातारा जिल्ह्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखाना वगळता उर्वरीत सर्वच साखर कारखान्यांनी आपल्या चालू गाळप हंगामातील नोंद असलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप करीत या हंगामाचा यशस्वी समारोप केला. गतवर्षीच्या तुलनेत चालू हंगामात वाढ होवून या हंगामात ७५ लाख मे. टन उसाचे गाळप करीत जवळपास ८८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन जिल्ह्यातील कारखान्याकडून झाले आहे. ‘कही खुशी कही गम’ याप्रमाणे चालू हंगाम हा कारखानदार तोडकऱ्यांसाठी दिवाळीचा तर ऊस उत्पादकांसाठी मात्र शिमगाच ठरला. या हंगामाच्या शुभारंभा पासूनच ऊस दराचे नैराश्य कायम राहिले. गतवर्षी प्रमाणे चालू वर्षी कोणतीही संघटना ऊस दरासाठी रस्त्यावर उतरलीच नसल्याने कारखानदारांनी आपल्या इच्छेप्रमाणे ऊस दर जाहीर करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा दर देताना केंद्राने जाहीर केलेल्या एफआरपी प्रमाणे दर देण्याचे बंधन नव्या सरकारने घेतल्याने जिल्ह्यातील किसनवीर, प्रतापगड, अजिंक्यतारा, सह्याद्री कारखान्यांनी एफआरपी पोटी पहिला हप्ता देऊन उर्वरीत रक्कम दुसऱ्या हप्त्याने देण्याची भूमिका घेत शासनाच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली. राज्य शासनाने ही कारखानदारांसाठी पॅकेज जाहीर केले. मात्र याची अंमलबजावणी अद्याप झालीच नसल्याने चालू हंगाम संपला तरी एफआरपी रक्कमेचा फरक शेतकऱ्यांच्या ऊस बील खात्यावर जमा झाला नाही. यामुळे यापुढे हा फरक मिळेल याबाबत प्रश्नच उपस्थित होत आहे. प्रतीवर्षी ऊस दराच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी चालू वर्षी गाळप हंगामापूर्वीच ऊस दर नियंत्रण समितीची स्थापणा झाली. मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना या कमिटीचे अध्यक्ष बनविले. व शेतकरी संघटना, प्रतिनिधी व कारखानदार प्रतिनिधी अशी कमिटी स्थापण झाली. या कमिटीबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा होत्या मात्र, ही कमिटी पहिल्याच मिटिंगमध्ये कारखानदार व शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यात ऊसदराबाबत एकमत न झाल्याने कमिटी बंद पडली. हंगामात नव्याने गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड या कारखान्याची भर पडली. या शिवाय फलटण येथील स्वराज इंडिया या कारखान्यानेही चाचणी गाळप हंगाम घेतल्यामुळे जिल्ह्यातील आव्हानात्मक वाटणारे ऊसाचे क्षेत्र संपविण्याचे काम वेळेत साध्य झाले. जिल्ह्यात सद्य:स्थितीस सह्याद्री हा एकमेव साखर कारखाना सुरू असून ६ ते ७ जून पर्यंत सह्याद्री कार्यक्षेत्रातील नोंद असलेला संपूर्ण ऊस गाळप केला जाईल, असा विश्वास कारखाना प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर) तोडकऱ्यांनी केला जल्लोष कारखान्याचा पट्टा पडण्याचा दिवस म्हणजे ऊस तोडणी मजुरांसाठी एक प्रकारे आनंद सोहळाच असतो. या दिवशी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची नारळ व ऊसाच्या छावळ्यांनी सजावट केली जाते. तसेच गुलाल व फटाक्यांच आतषबाजी करीत ऊसाने भरलेल्या वाहनांनी मिरवणूक काढली जाते. ऊस तोडणी मजूर या दिवसाचे मोठ्या जलोषात स्वागत करतात. असाच जल्लोष जिल्ह्यातील अजिंक्यतारा, प्रतापगड व किसन वीर कारखान्याच्या ऊस तोडणी मजूरांनी केला. किसन वीर, प्रतापगड कारखाना कार्यक्षेत्रात कारखान्याकडे नोंदविण्यात आलेल्या संपूर्ण ऊसाची तोडणी झाली आहे. काही अडचणीमुळे थोड्या क्षेत्रातील ऊस शिल्लक राहिला आहे. - विजय वाबळे, कार्यकारी संचालक, किसन वीर कारखाना