कऱ्हाड : येथील सोळा वर्षांची दैदिप्यमान परंपरा असलेल्या कोटा ॲकॅडमीत नववी, दहावी, अकरावी व बारावीचे प्रवेश सुरु झाले आहेत. येत्या ६ मेपासून ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरु होणार आहेत. शासनाने परवानगी दिल्यानंतर ऑफलाईन पद्धतीने शिकवले जाणार असल्याची माहिती संचालक महेश खुस्पे व मंजिरी खुस्पे यांनी दिली.
नुकताच कोटा ज्युनिअर कॉलेजला ‘टेक्नॉलॉजी पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. गेले वर्षभर ॲकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तम टेक्नॉलॉजीद्वारे ऑनलाईन शिक्षण दिले गेले आहे. कोटा ॲकॅडमीने व्हिडीओ लेक्चरसाठी खास ॲप व प्लॅटफॉर्म तयार केला असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन लाईव्ह लेक्चर व ऑनलाईन टेस्ट देता येत आहेत. गेल्या १५ वर्षांत कोटा ॲकॅडमीने अनेक आयआयटीयन, इंजिनिअर्स, डॉक्टर्स व शास्त्रज्ञ तयार केले आहेत. कोटा ॲकॅडमीचे अनेक विद्यार्थी हे विविध नामांकित क्षेत्रात काम करत आहेत.
कोटा (राजस्थान) येथून आलेले शिक्षक येथे शिकवण्यासाठी असून, विद्यार्थ्यांना कोटा (राजस्थान) येथील स्टडी मटेरियल तसेच टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिले जाते. विद्यार्थ्यांना शिकवताना डिजिटल कंटेंट तसेच सुसज्ज पॉवर पॉईंटद्वारे विषय शिकवले जातात. दररोज डाऊट सेशन तसेच सुपरवाईझ स्टडीद्वारे विद्यार्थ्यांना घडवले जाते. कोटा ॲकॅडमीला आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असून, विविध प्रसारमाध्यमांनी ॲकॅडमीच्या कार्याची दाखल घेऊन प्रशंसा केली आहे. इच्छुक विद्यार्थी व पालकांनी प्रवेशासाठी कोटा ॲकॅडमीशी संपर्क साधावा, असे आवाहन कोटा ॲकॅडमीचे संचालक डॉ. महेश खुस्पे व संचालिका मंजिरी खुस्पे यांनी केले आहे. (वा प्र )
फोटो
महेश खुस्पे
मंजिरी खुस्पे