शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

‘सह्याद्री’ विरोधात एल्गार !

By admin | Published: December 09, 2015 11:40 PM

‘स्वाभिमानी’ संघटना आक्रमक : गत हंगामातील ९९ रुपयांचे देयबिल त्वरित द्या; सचिन नलवडे यांचा इशारा

कऱ्हाड : ‘सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने २०१३-१४ च्या गळीत हंगामातील देय असलेल्या फायनल बिलातील ९९ रुपये अद्यापही दिलेले नाहीत. ऊसउत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संचालक मंडळाने हे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावे. अन्यथा १३ डिसेंबरपासून कारखान्याविरोधात तीव्र आंदोलन उभे करू,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.पत्रकात म्हटले आहे की, कायद्याप्रमाणे ऊस गेल्यानंतर चौदा दिवसांमध्ये ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना उसाचे पैसे देणे कारखानदारांना बंधनकारक आहे. मात्र कारखानदार शेतकऱ्यांना व शासनाला साखरेच्या पडलेल्या बाजारभावाचा बागूलबुवा दाखवून ‘एफआरपी’ देणे शक्य नसल्याचे सांगत आहेत. त्यांचे हे कारस्थान शेतकरी उलथून लावल्याखेरीज राहणार नाहीत.आज साखरेचा दर २६०० रुपयांच्या आसपास आहे. सातारा जिल्ह्यातील उसाची सरासरी रिकव्हरी ११.५० टक्के इतकी आहे. एक टन उसापासून कारखानदारांना ३१२० रुपयेची साखर मिळत आहे.तसेच मळी, बगॅस, इथेनॉल, डिस्लरी व को-जनरेशनद्वारे साखर कारखान्यांना सुमारे तीनशे रुपये जास्त उत्पन्न मिळतात. ५०० रुपये तोडणी वाहतूक खर्च वजा करता शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे २४०० ते २७०० रुपयेपर्यंत रूक्कम देण्यास अडचण नाही. तसेच महाराष्ट्र शासनाने ऊसखरेदी कर माफ केल्याने ९० ते ११० रुपये कारखान्यांना जादा मिळतात.साखरेचे मूल्यांकन ८५ टक्यांवरून ९० टक्के केल्याने १४० रुपयेची जादा उचल कारखानदारांना मिळत आहे. तर साखर निर्यातीसाठी टनाला ४५ रुपये शासन देणार आहे. तरीही ‘एफआरपी’ द्यायला टाळाटाळ का? याचा जाब स्वाभिमानी शेतकरी विचारल्याशिवाय राहणार नाही.पत्रकावर दक्षिणचे तालुकाध्यक्ष देवानंद पाटील यांच्यासह दादासाहेब यादव, बापूसो साळुंखे, प्रदीप मोहिते, राजेंद्र पाटील, विकास हादगे, संदीप पवार, विकास पाटील, कृष्णत क्षीरसागर यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)१३ डिसेंबरला रास्तारोको...स्वाभिमानीचे खा. राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी साखर कारखानदारांना ‘एफआरपी’ प्रमाणे दर देण्यासाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. कारखानदारांनी ऊसगाळपाला सुरुवात करून महिना लोटला तरी ‘एफआरपी’ प्रमाणे ऊसदराचा पहिल्या हप्त्याचा पत्ता लागलेला नाही. त्यामुळे संघटनेच्या आदेशानुसार कऱ्हाड, पाटण तालुक्यात १३ डिसेंबरपासून रास्तारोको व ऊसतोड बंद आंदोलन करण्यात येणार आहे.