उंडाळे (ता. कऱ्हाड) परिसरात तालुका कृषी विभागाच्या वतीने लोकरी माव्याच्या प्रादुर्भावाबाबत शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शास्त्रज्ञ आर. एस. जगताप, मंडल कृषी अधिकारी एम. आय. शेख, कृषी पर्यवेक्षक बी. बी. तोरणे, एच. एल. वाघमारे, अतुल रेडीज, नितेश पवार, कृषी सहाय्यक व शेतकरी उपस्थित होते.
खांडेकर म्हणाले, ‘ढगाळ वातावरण, सत्तर ते नव्वद टक्के असणारी आर्द्रता ही लोकरी माव्याच्या वाढीसाठी अनुकूल ठरते. याचा प्रसार रोखण्यासाठी प्रादुर्भाव क्षेत्रातील ऊस बियाणे म्हणून वापरू नये, ऊस लागण करताना पट्टा पद्धतीने किंवा रुंद सरी पद्धतीने करावी, सुरुवातीच्या काळात कमी क्षेत्रावर प्रादुर्भाव आढळल्यास पाने काढून टाकावीत, अतिपाण्याचा वापर टाळावा, अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा, नत्रयुक्त खतांचा अधिक वापर टाळावा, शेणखत गांडूळ खत यांचा अधिक वापर करावा म्हणजे प्रादुर्भाव टाळणे शक्य होईल.’
फोटो १६कराड-लोकरी मावा
उंडाळे (ता. कऱ्हाड) परिसरात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी अधिकाऱ्यांनी लोकरी माव्याचा प्रादुर्भाव याची माहिती घेतली आहे.