सचिन काकडे ।सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांची आक्रमकता सर्वश्रूत आहे. मग जिल्ह्याचे राजकारण असो की स्थानिक स्वराज्य संस्थेचे. आजपावेतो त्यांच्या आक्रमक शैलीची प्रचिती सातारकरांना अनेकदा आली आहे, असे असताना दुसरीकडे राजेंच्या पालिकेतील साम्राज्यातच अनेक आक्रमक चेहरे उदयास येऊ लागले आहेत. फोडाफोडीचे स्वर सर्वांच्या कानावर आदळू लागले आहेत.
एकूणच कोणत्या न कोणत्या कारणाने पालिकेचे राजकारण ढवळून निघत असताना, लुटूपुटूच्या लढाया थांबवा व शहराच्या विकासावर लक्ष केंद्रीत करा, असे सूरही सातारकरांमधून उमटू लागले आहेत.सातारा पालिकेत आजपर्यंत खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाची सत्ता होती. मात्र, २०१६ च्या निवडणुकीत मनोमिलनही तुटले. या निवडणुकीत खासदार उदयनराजे गटाच्या शिलेदारांनी नगराध्यक्षपदासह पालिकेचा गड काबीज केला. तर भाजपच्या सहा नगरसेवकांनी पालिकेत प्रवेश केला.
पालिकेत सातारा विकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे गटाच्या नगर विकास आघाडी व भाजप नगरसेवकांना विरोधी बाकावर बसावे लागले. निवडणुकीनंतर दीड वर्षाच्या कालावधीत शहर विकासाच्या मुद्यावरून विरोधक व सत्ताधाºयांमध्ये शाब्दिक वाद नेहमीच पाहावयास मिळाले. सत्ताधाºयांची ही एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी आता विरोधकही भलतेच आक्रमक होऊ लागले आहेत. सभा वेळेत न घेणे, सभेची टिपण्णी न देणे, चर्चा न करता बहुमताने विषय मंजूर करणे अशा अनेक कारणांनी विरोधकांची कोंडी झाली आहे. याचे परिणाम पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत उमटले.
भाजप नगरसेवक धनंजय जांभळे यांनी कामे न करणाºयांना दांडक्याने चोपण्याची भाषा केली. तर दुसरीकडे सर्वच विरोधकांनी सत्ताधाºयांविरोधात जिल्हाधिकारी व न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत खासदार उदयनराजे भोसले यांच्या आक्रमक शैलीची झलक आज चक्क विरोधकांमध्ये दिसू लागली आहे. बंदूक काढण्यापासून ते दांडक्याने चोपण्यापर्यंतच्या गोष्टी पालिकेत घडू लागल्या आहेत. या सर्व घडामोडीने पालिकेचे राजकारण दूषित होत असतानाच सत्ताधारी व विरोधकांनी विकासावर लक्ष केंद्रीत करावे, असे सूर नागरिकांमधून उमटू लागले आहे.नगरविकास आघाडीचे मौन...धनंजय जांभळे यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप ठेवून त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पालिकेतील कर्मचाºयांनीही या घटनेच्या निषेधार्थ कामबंदचे हत्यार उपसले. इतक्या घडामोडी होऊनही नगरविकास आघाडीने या घटनेचा निषेध न करता मौन धारण करणे पसंत केले. एकेकाळी शिवेंद्रसिंहराजेंचे कट्टर समर्थक असलेल्या जांभळे यांना पालिकेचे तिकीट न मिळाल्याने भाजपमध्ये प्रवेश करून ते निवडून आले. या घडामोडी पाहता नगरविकास आघाडीची जांभळे यांना अंतर्गत फूस आहे की काय, अशी चर्चा पालिकेच्या वर्तुळात सुरू आहे.
शहर विकासासाठी मुख्यंमत्री, महसूल मंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. कोट्यवधीचा निधी मंजूर केला. या निधीतून विकासकामे वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असताना सत्ताधारी अजेंड्यावर एकही विषय घेत नाही. उलट आमचा विश्वासघात करीत आहे. सातारा पालिका जिल्ह्याचं नाक आहे. या पालिकेचा इतरांनी आदर्श घ्यायला हवा, परंतु इथेच मूलभूत समस्यांसाठी झगडावं लागत आहे. वारंवार मागणी करूनही नागरिकांची मुलभूत कामे मार्गी लागत नसतील तर आम्ही गप्प किती वेळ बसायचे.- धनंजय जांभळे, नगरसेवक, भाजप्सातारा शहराचा आणि प्रत्येक प्रभागाचा विकास व्हावा, ही खासदार उदयनराजे भोसले यांची अपेक्षा आहे. आमचा कोणालाही विरोध नाही. विरोधकांनी केवळ विषयाला धरून चर्चा करावी. सभा सुरू असताना प्रत्येक विषयांवर चर्चा होणे गरजेचे आहे, परंतु विषय मांडण्यापूर्वीच विरोधक गोंधळ घालतात. गत सभेच्या अजेंड्यावर विरोधकांचे विषय घेण्यात आले. मात्र त्यांनी सभात्याग केला. विरोधकांनी नियमबाह्य वागू नये.-स्मिता घोडके, गटनेत्या, साविआअनेक नगरसेवकांनी शहरात एकत्र काम केलं आहे. त्यामुळे एकमेकांच्या उणिवा, बारकावे दोन्ही बाजूंना ज्ञात आहेत. पालिकेतील गोंधळामुळे शहराची प्रतिमा मलीन होत चालली आहे. आतापर्यंत जे झाले ते पुरे येथून पुढे दोन्ही आघाडीतील लोकप्रतिनिधी पदाधिकाºयांनी सामंज्याची भूमिका घ्यावी. विरोधकांनी व सत्ताधाºयांनी लुटूपुटूच्या लढाया थांबवून शहराच्या विकासावर लक्ष केंद्रीत करणे अत्यंत गरजेचे आहे.- शंकर माळवदे, माजी उपनगराध्यक्षधनंजय जांभळे यांनी पक्षाकडून तीन कोटींचा निधी मंजूर करून आणला. मात्र, त्यांना त्यांच्याच वॉर्डातील कामांसाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. मुख्याधिकारी अथवा सत्तारुढ आघाडी कोणतंही काम करायला तयार नाही. जनतेची कामे होत नसतील तर संताप व्यक्त करणे स्वाभाविकच आहे. नगराध्यक्षांना जनतेने निवडून दिले आहेत. मात्र, त्यांनाच जनतेच्या मुलभूत कामांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.- अशोक मोने, विरोधी पक्ष नेता, नविआा