मलकापूर (जि. सातरा) 27 : येथील नगरपंचायतीने नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी जलद कृती आराखडा तयार केला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली असून सर्व विभागातील कर्मचाºयांच्या ठराविक तुकड्या व आपत्कालीन साहित्यासह स्थानिक प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन सज्ज ठेवले आहे.
मलकापूर शहर हे आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी वसालेले शहर आहे. केवळ दहा वर्षात लोकसंख्या झपाट्याने वाढून ३२ हजारावर गेली आहे. सर्व पातळीवर शहराची प्रगती होत असताना तेवढ्याच झपाट्याने शहरातील स्थानिक प्रशासनाच्या जबाबदाºयाही वाढल्या आहेत.
शहराच्या दक्षिण-पश्चिम भागात आगाशिवचा डोंगर तर उत्तरेकडील भागात कोयना व कृष्णा नदी वाहत आहे. तर शहराच्या मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ गेल्यामुळे शहराची ९ चौरस किलोमीटरमधे नागरी वस्ती पसरली आहे. सतरा लोकनियुक्त नगरसेकांसह दोन स्विकृत नगरसेवक असे चार प्रभागात एकूण १९ लोकप्रतिनीधी कार्यरत आहेत. मुख्याधिकारी यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी शहराची सर्वांगिण जबाबदारी सांभाळत आहेत.
शहराची भौगोलिक परिस्थिती व शासनाच्या नियमानुसार शहरासाठी आपत्कालीन व्यवस्थापन असणे बंधनकारक असाते. मलकापूर शहराला आजपर्यंत पूर परिस्थितीचा कधीच सामना करावा लागला नाही. मात्र शहरालगत असणाºया कºहाड शहरासह कापील, गोळेश्वर, आटके या नदीकाठच्या गावांमधील पूर परिस्थितीवर लक्ष ठेवणे व आगाशिव डोंगर उतारावरून वाहणाºया पाण्याचा योग्य निचरा करून देण्यासाठी तसेच इतर नैसर्गिक आपत्कालीन काळात सहकार्य करण्यासाठी मलकापूरचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
आपत्कालीन काळात तातडीने संपर्क करण्यासाठी नगरपंचायतीचा टोल फ्री नंबर व सर्व कार्यालयीन फोन नंबर जाहीर केले आहेत. याशिवाय नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांसह ९ विभागातील ३९ कर्मचाºयांच्या मोबाईल नंबरचा समावेश करण्यात आला आहे.
याबरोबरच कºहाड येथील १४ सरकारी व निमसरकारी कार्यालयांचे व अधिकाºयांचे दूरध्वनी क्रमांक, अत्यावश्यक सेवा, चौकशीसाठी पोलीस ठाणे, विविध अग्निशामक केद्र, रूग्नालये, रूग्णवाहीका, महावितरण कार्यालय, दुर संचार अशा अत्यावश्यक सेवांच्या फोन नंबरचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर पूर परिस्थितीत मदत करण्यासाठी पोहणाºया दहा व्यक्तींची यादी व फोन नंबर समाविष्ट करण्यात आले आहेत. समितीअंतर्गत सात विभागनगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी मिळून एक ९ सदस्यांची आपत्ती व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली आहे. या समितीत सर्व ८ विभागाच्या विभागप्रमूखांचा समावेश करण्यात आला आहे. कार्यालयप्रमुख व पूर नियंत्रक म्हणून मुख्याधिकारी संजीवनी दळवी या काम पहात आहेत. या समितीअंतर्गत सात विभाग तयार करण्यात आले आहेत.