शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

साताऱ्यात आपत्कालीन कक्ष सुरू; पूरस्थिती हाताळण्यासाठी बोटिंग चाचणी

By नितीन काळेल | Published: June 01, 2024 7:21 PM

पावसाळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज : विविध पातळीवर उपाययोजना तयार 

सातारा : पावसाळा सुरू झाला असून, जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एक जूनपासूनच आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आला आहे. तर पावसाळ्यातील पूरस्थिती हाताळण्यासाठी कऱ्हाड आणि पाटण तालुक्यात नदीमध्ये बोटिंग चाचणी घेण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध पातळीवर तयारी आणि उपाययोजना केल्या आहेत.जिल्ह्यात जूनपासून पावसाला सुरुवात होते. दरवर्षी साधारणपणे ७ ते १० जूनदरम्यान मान्सूनचे आगमन होते. त्यानंतर पाऊस पडण्यास सुरुवात होते. सुरुवातीचे दोन ते अडीच महिने जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवाधार पाऊस कोसळतो. महाबळेश्वर, कोयना, कास, बामणोली, तापोळा, कांदाटी खोऱ्यात पर्जन्यमान अधिक राहते. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत होते. अनेक दिवस लोकांना घराबाहेर पडता येत नाही.तसेच रस्त्यावर दरडी कोसळण्याचा धोका असतो, झाडे पडतात. अशा काळात वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनतो. त्याचबरोबर अतिवृष्टीच्या काळात कोयना, कृष्णा नदीला महापूर येतो. काहीवेळा पाणी पात्राबाहेर जाते. यासाठीही जिल्हा प्रशासनाला दक्ष राहावे लागते. याकरिता जिल्हा प्रशासन एक महिना अगोदरच आढावा घेऊन तयारी करते. आताही पावसाळ्याला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात दरवर्षी एक जूनपासून आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात येतो. हा कक्ष २४ तास सुरू असतो. आताही हा कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. तसेच विविध विभागांचेही कक्ष सुरू राहणार आहेत. तर कऱ्हाड आणि पाटण तालुक्यात पूरस्थिती निर्माण होते. नदीकाठच्या रहिवाशांना धोका निर्माण होतो. या काळात उपाययोजना राबविण्यात येतात. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन विभागाच्या वतीने कऱ्हाड येथील प्रीतिसंगम परिसरात बोटिंग चाचणी घेण्यात आली. यावेळी बोटी, लाइफ जॅकेट, दोरखंड, स्ट्रेचर आदींचा वापर करण्यात आला.यावेळी कऱ्हाड पालिकेचे पथक तसेच १५० होमगार्ड्स, नदी काठावरील गावांतील तरुण, तलाठी, मंडलाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवीदास ताम्हाणे, होमगार्डचे केंद्रनायक तुषार वरांडे आदी उपस्थित होते. कऱ्हाडनंतर पाटण तालुक्यातही पूरस्थिती हाताळण्यासाठी बोटिंग चाचणी झाली. मुळगाव येथे कोयना नदीत हे प्रात्यक्षिक पार पडले. यावेळी तहसीलदार अनंत गुरव तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.कोयना धरणावर पूर नियंत्रण कक्ष..सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात कोयना धरण आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणाचे तांत्रिक वर्ष एक जूनपासून सुरू झाले. तर धरणावर शनिवारपासूनच पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास धरणात १७.५८ टीएमसी पाणीसाठा होता. पावसाळ्यात अतिवृष्टीच्या काळात पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयनेच्या सहा दरवाजांतूनही विसर्ग करावा लागतो. त्यामुळे कोयना नदीला पूर येतो. तसेच कऱ्हाड येथेही पूरस्थिती बनते.

ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर स्थलांतरणाची जबाबदारी..

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी १५ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून पूर्व आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी हवामान विभागाकडून सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्यावर पूर आणि दरड प्रवण गावांतील नागरिकांना त्यांच्या पशुधनासह तत्काळ हलविण्याची व्यवस्था करावी. नागरिकांच्या निवारा, अन्न, पाणी, वीज आदी सोयीसुविधांबरोबर जनावरांसाठी पाण्याची व चाऱ्यांची व्यवस्था करावी. नागरिकांचे स्थलांतर करण्याची जबाबदारी ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील व कोतवाल यांच्याकडे द्यावी, अशी स्पष्ट सूचना केली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfloodपूर