शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

धास्तावल्या विद्यार्थ्यांना ‘लिफ्ट’ची उभारी

By admin | Published: March 03, 2015 10:05 PM

दहावी परीक्षेचा पहिला दिवस : केंद्रावर वेळेत पोहोचविण्यासाठी परीक्षार्थींना सातारकरांचा मदतीचा हात--लोकमत इनिशिएटिव्ह

सातारा : कधी नव्हे ते गावाकडच्या बसथांबे गर्दीने ओसंडलेले होते. साडेदहाची वेळ गाठण्याचं टेन्शन सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. अशा वेळी परीक्षेच्या टेन्शनने धास्तावलेल्या विद्यार्थ्यांना ‘लोकमत’नं ‘लिफ्ट’ देऊन त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत सुखरूप पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडली. ‘लोकमत’नं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारकरांनीही परीक्षार्थींना वाहनातून परीक्षा केंद्रांवर सोडले.आज (दि. ०३) दहावीचा पहिला पेपर. विद्यार्थ्यांसह पालकांचीही भलतीच धांदल उडाली होती. परीक्षेचे साहित्य बरोबर घेतलंय ना, बस लवकर मिळेल ना, वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता येईल ना, अशा अनेक प्रश्नांचं ओझं डोक्यावर घेऊनच अनेकांना सकाळी घर सोडलेलं अन् बसस्टॉप गाठलेले. ग्रामीण भागात शिकणारे हजारो विद्यार्थी आज दहावीच्या परीक्षा देण्यासाठी परगावी जाणार होते. एसटी बस, वडाप वेळेवर मिळेलच याची शाश्वती नाही, यासाठी नागरिकांनी आपल्या दुचाकी अथवा चारचाकी वाहनातून परीक्षार्थींना ‘लिफ्ट’ द्यावी, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले होते. इतरांना नुसते आवाहनच न करता बुधवारी ‘लोकमत’च्या कर्मचाऱ्यांनी याची स्वत:पासून सुरुवात केली अन् अनेक विद्यार्थ्यांना दुचाकीवरून परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचविले.वाढे फाटा येथे सकाळी परीक्षार्थी वाहनाची वाट पाहत उभे होते. मात्र, वाहन मिळत नव्हते. अशा वेळी ‘लोकमत’च्या कर्मचाऱ्यांनी मुलांना आपल्या दुचाकीवरून शहरातील सयाजी विद्यालय, अनंत इंग्लिश स्कूल अशा विविध परीक्षा केंद्रांवर पोहोचविण्याचे काम केले. परीक्षेची वेळ अकराची असल्यामुळे शहरातील विद्यार्थी चालत निघाले असताना उशीर झाल्यामुळे येणार-जाणाऱ्या वाहनांना हात करत होते. अशा धास्तावलेल्या अनेक विद्यार्थ्यांना ‘लोकमत’च्या टीमने परीक्षा केंद्रांवर पोहोचविण्याचे काम केले. (प्रतिनिधी)बैठक क्रमांक शोधण्यातही मदतधास्तावलेल्या विद्यार्थ्यांना ‘लिफ्ट’ देऊन आपल्या दुचाकीवरून परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचविण्याबरोबरच ‘लोकमत’च्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक शोधण्यातही मदत केली. शिवाय परीक्षेसाठी आवश्यक सर्व साहित्य बरोबर आणले आहे का, याची विचारपूस करून मनोधैर्य वाढविले, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.पहिलाच पेपर असल्यामुळे परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता येईल की नाही, या धास्ती होती. वाडेफाट्यावर वाहनाची वाट पाहत उभे असताना ‘लोकमत’च्या कर्मचाऱ्यानं ‘लिफ्ट’ दिली. आणि मला सयाजीराव विद्यालयाजवळ वेळेत पोहोचविले. वेळेपूर्वी पोहोचल्यामुळं मला नंबर कुठं आलाय हे पाहता आलं. - रोहन वाघ, विद्याथीघरातून निघायला थोडा उशीर झाल्यामुळं खूप टेन्शन आलं होतं. समर्थ कॉलनी (वाडेफाटा) येथे वाहनाची वाट पाहत होतो. त्यावेळी ‘लोकमत’च्या कर्मचाऱ्यानं मला दुचाकीवर बसवून परीक्षा केंद्रावर पोहोचविले. वेळेत पोहोचल्यामुळं खूप ‘रिलॅक्स’ झालो. ‘लोकमत’ला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत.- प्रसाद यादव, विद्यार्थी