शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

नोकरदारांचा रविवार रांगेत!

By admin | Published: November 13, 2016 11:25 PM

तुफान गर्दीचा चौथा दिवस : बँका, एटीएमसमोर लांबच लांब रांगा

सातारा : नोकरदारांसाठी रविवार मजेचा दिवस. उशिरापर्यंत झोपायचं. चहा, नास्टा झाल्यावर थोडं फिरून यायचं. दुपारचं जेवण झालं की पुन्हा टीव्ही पाहत पडून राहायचं. पण हा रविवार त्यांच्यासाठी वाईट गेला. बहुतांश नोकरदारांना जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये किंवा पैसे काढण्यासाठी एटीएमसमोर लागलेल्या रांगेत थांबून घालवावा लागला. पाचशे अन् हजारांच्या नोटा व्यवहारातून मंगळवारी रात्रीपासून तडकाफडकी रद्द करण्यात आल्या. त्यानंतर बुधवारी बँका अन् एटीएम बंद होते. त्यामुळे दोन दिवस कोणालाच काही करता आले नाही. जुन्या नोटा बदलण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली. संभाव्य गर्दीचा विचार करून नियमित वेळेच्या एक तास अगोदरच बँका उघडल्या; पण सर्वसामान्य ग्राहकांनी नऊपासूनच लांबच लांब गर्दी केली होती. एटीएम शुक्रवारपासून सुरू झाले; पण रविवारीही सत्तर टक्के एटीएम बंद आहेत. त्यामुळे आर्थिक नाकेबंदी सगळीकडून होऊ लागली आहे. बँकांसमोर सकाळसकाळ लागलेल्या रांगा पाहून नोकरदारांना कामावर जावे लागत होते. त्यांना जुन्या नोटा बदलण्यासाठी संधीच मिळाली नाही. त्यामुळे त्यांना रविवारी आळस झटकून सकाळीच बँकांमध्ये यावे लागले. अनेकांचा निम्मा दिवस जुन्या नोटा भरण्यासाठी बँकांमधील रांगेत तर उरलेला वेळ एटीएमसमोरच्या रांगेत घालवावा लागला. (प्रतिनिधी) पुन्हा आठ दिवस कोणाला वेळ... दिवाळीत पुरेशी खरेदी झालेली असल्याने अनेकांना गेल्या आठवड्यात फारशी गैरसोय झाली नाही. मात्र, आता शाळा-महाविद्यालये सुरू होत आहेत. त्यामुळे शाळांचा खर्च वाढणार आहे. साहजिकच खर्च आणखी वाढणार आहे. तसेच नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी पेट्रोलशिवाय पर्याय नाही. पण, पेट्रोलपंपावरही अडवणूक केली जाते. पुन्हा आठवडाभर सुट्या नसल्यामुळे आठ दिवस लागणाऱ्या पैशांची सोय करावी लागणार आहे. त्यामुळे गर्दी पाहायला मिळत होती.