शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक कामांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 8:12 PM

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात तब्बल १००० कामे सुरू आहेत. व्यक्तिगत लाभाच्या योजनांमध्येच मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ वापरले जात आहे

सातारा : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात तब्बल १००० कामे सुरू आहेत. व्यक्तिगत लाभाच्या योजनांमध्येच मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ वापरले जात आहे. तब्बल ५ हजार लोकांना या निमित्ताने रोजगार मिळाला आहे.

रोजगार हमी योजनेद्वारे गतवर्षी ३५ कोटी रुपये निधी खर्च झाला आहे. सार्वजनिक कामांची मागणीच नसल्याने या कामांवर एकही मजूर सेवेसाठी नाही. मात्र, व्यक्तिगत लाभाच्या योजनांसाठी मजुरी दिली जाते. सिंचन विहिरी, जनावरांचा गोठा, रेशीम उद्योग, तुती लागवड, कुक्कुटपालन शेड, फळबाग लागवड, राहती घरे, शेततळी उभारणी अशी जी व्यक्तिगत कामे आहेत, या कामावर काम करणाऱ्या २०१ रुपये प्रतिदिन मजुरी दिली जाते. जिल्'ातील ५ हजार मजुरांना प्रतिदिन २०१ रुपये याप्रमाणे मजुरी देण्यात येते.

संबंधित मजुरांनी यासाठी ७ ते ८ तास काम करणे आवश्यक आहे. एखाद्या कामाला जेवढे मनुष्यबळ देण्यात आले आहे, त्यांनी ७ ते ८ तास प्रतिदिन काम केल्यानंतर किती दिवसांत हे काम पूर्ण होईल, याचा अंदाज बांधून रोजगार हमी योजनेतून पैसे दिले जातात.

जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना २००८-०९ पासून सुरू झाली असून, आजअखेर या योजनेंतर्गत ३७ हजार ७३९ कामे पूर्ण झाली आहे. १० हजार १५७ कामे सुरू आहेत. या कामांमध्ये ३,९६२ विहिरी, ६३५ फळबाग लागवड, ४,७९८ घरकुले, शौचालये, २२८८ जनावरांचे गोठे, ४६२ पाणंद रस्ते, ४,२९९ शोषखड्डे, २,९३० गांडूळ नाडेफ खत युनिट आदी कामे करण्यात आली आहेत.

इतर कामांमध्ये रोपवाटिका, सीसीटी, तलावातील गाळ काढणे, वृक्षलागवड आदी कामे आहेत. एप्रिल २०१८ पासून सातारा जिल्'ात १९ हजार ९३२ जॉब कार्डधारक कुटुंंबातील ३३ हजार ३१ मजुरांनी काम केले आहे. चालू आर्थिक वर्षात १ हजार २८८ कामे पूर्ण असून, ३ हजार ३११ कामे प्रगतिपथावर आहेत.८ हजार नवीन कामेजिल्'तील तब्बल ८ हजार नवीन कामांना लवकरच प्रशासकीय मान्यता देण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी) संजय पाटील यांनी दिली. 

कामासाठी स्थानिक गावातील मजूर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. मजुरांचे स्थलांतर झालेले नाही. अकुशल कामासाठी निधी उपलब्ध आहे. रस्त्यांची, ग्रामपंचायत भवन, शाळेची मैदाने आदी कामे या मजुरांकडून केली गेली आहेत.- संजय पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgovernment schemeसरकारी योजना