शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

सहा दिवसांत सक्तमजुरीची शिक्षा

By admin | Published: March 27, 2017 11:43 PM

रेल्वे पोलिसांची तत्परता : चोरीप्रकरणी कोरेगाव न्यायालयाचे जलदगतीने कामकाज

कोरेगाव : रेल्वे पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार शाहरुख हसन बागवान याला चोरीच्या गुन्ह्यात मिरज पोलिसांनी सोमवारी अटक केली होती. त्याने चोरीची बॅग कोरेगाव रेल्वे स्थानकाच्या हद्दीत टाकल्यामुळे त्याच्या विरोधात कोरेगाव न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने जलदगतीने कामकाज करत अवघ्या सहा दिवसांमध्ये त्याला सहा महिने सक्तमजुरी आणि तीनशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्याची माहिती अशी की, शाहरुख बागवान (रा. भवानी पेठ, पुणे) याच्या विरोधात रेल्वेमध्ये चोरीचे आठ गुन्हे नोंद आहेत. सोमवार, दि. २० रोजी अजमेरहून बंगलोरकडे निघालेल्या एक्स्प्रेसमध्ये त्याने एका प्रवाशाची बॅग चोरली. बॅग चोरीस गेल्याचे लक्षात आल्यावर संबंधित प्रवासी व त्याच्या नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यानच्या काळात शाहरुखने एक्स्प्रेसमधील स्वच्छतागृहात जाऊन चोरीची बॅग खाली फेकून दिली. ही घटना कोरेगाव रेल्वे स्थानकाच्या हद्दीत घडली. या प्रवाशाने मिरज रेल्वे पोलिस ठाण्यात बॅग चोरीची फिर्याद दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांनी तत्काळ पोलिस अधीक्षक (लोहमार्ग, पुणे) डॉ. प्रभाकर बुधवंत यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार रेल्वे पोलिसांनी त्याचदिवशी रात्री सांगली येथून शाहरुख बागवानला अटक केली. त्याने कोरेगावात येऊन बॅग शोधून पोलिसांच्या हवाली केली. सहायक फौजदार एम. जे. दरेकर यांच्यासह पोलिस हवालदार अजित सावंत, भार्गव साखरे, नाईक एम. ए. साठे, महिला पोलिस नाईक एस. के. सरोदे, शिपाई आर. एस. भोसले, एम. एस. निर्मळ यांनी तातडीने तपास पूर्ण केला आणि गुन्हा घडल्यापासून अवघ्या चोवीस तासांत कोरेगाव न्यायालयात बागवान याच्या विरोधात दोषारोपपत्र सादर केले. यावेळी बागवान याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी महेश शिलार यांनी याप्रकरणी सोमवार, दि. २७ रोजी सुनावणी होऊन सर्व साक्षीदारांचे जाबजवाब झाले. पोलिस अभियोक्ता नितीन कानिटकर यांनी बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने शाहरुख बागवान याला दोषी ठरवत सहा महिने सक्तामजुरी आणि तीनशे रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.