खड्ड्यांमुळे त्रस्त (फोटो : ०२इन्फोबॉक्स०१)
कऱ्हाड : शहरातील दत्त चौक, पोपटभाई पेट्रोलपंप चौक तसेच कोल्हापूर नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मुख्य चौकासह अंतर्गत भागातही पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासी व वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
साईडपट्ट्यांची दुरवस्था
तांबवे : तांबवेफाटा ते साजूर मार्गावरील रस्त्याच्या साईडपट्ट्या ठिकठिकाणी खचल्या आहेत. साईडपट्ट्यांवरील लोखंडी बॅरिकेड्स निघाले आहेत. खचलेल्या साईडपट्ट्यांवरून दुचाकी जात असताना चालकाचा तोल जाऊन अपघात होत आहेत.
फलकांची मोडतोड
तांबवे : पाटण ते कऱ्हाड या मार्गावरील सूचना व दिशादर्शक फलकांची दुरवस्था झाली आहे. लोखंडी फलकांना गंज चढला असून काही ठिकाणी फलक मोडून पडले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.