फेऱ्यांचे नियोजन
सातारा : राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या सातारा विभागातील ११ आगारांमार्फत दि. १४ मार्च अखेर सलग सुटीच्या पार्श्वभूमीवर लांब पल्ल्यासह विविध मार्गावर जादा एसटीचे नियोजन करण्यात आले आहे. जादा बसेसचा लाभ जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक साघर पळसुळे यांनी केले आहे. सुटीमुळे जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
वाळूचे ढीग रस्त्यावर
सातारा : शहरात आता पावसाने उघडीप दिली आहे. तसेच कोरोनाचे सावट कमी झाले असल्याने इमारत बांधकामाचा वेग वाढला आहे. मात्र, बांधकामासाठी आणलेले कचऱ्याचे ढीग रस्त्यातच पडत आहेत. त्यामुळे वाहने घसरण्याचे प्रमाण वाढत झाले आहे. त्यामुळे दुचाकीस्वार जखमी होत असतात.
अनेक ठिकाणी खुदाई
सातारा : शहरातील ठिकठिकाणी पाणी गळती, नवीन नळ कनेक्शन, इंटरनेट वायरिंगसाठी खोदकामे सुरू असल्याने रस्त्यांची वाट लागत असून, वाहनधारकांची गैरसोय होत आहे. शहरातील राजपथ, शाहू चौक, देवी चौक परिसरात पाणी गळतीसाठी ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे.
पुस्तकांचे वाटप
सातारा : जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी शाळा बंद असल्याने घरोघरी जाऊन गोष्टींची पुस्तके विद्यार्थ्यांना दिली. ही पुस्तके मुख्याध्यापक आणी शिकक्षांनी स्वत:च्या पैशातूक खरेदी केली आहेत. या उपक्रमासाठी शिक्षकांनी परिश्रम घेतले.
महाबळेश्वर नगरपालिकेकडून दुर्लक्ष
महाबळेश्वर : स्वच्छता अभियानात अव्वल आलेल्या महाबळेश्वर नगरपालिकेच्या डेपोवर टाकण्यात आलेला ओला कचरा हा जंगलातील पाळीव गायींसाठी जीवघेणा ठरत आहे. ओल्या कचऱ्याबरोबरच प्लास्टिकही या गायी खात आहेत. यापैकी अनेक गायींचे दूध महाबळेश्वरकरांच्या घरात पोहोचत आहे. या समस्येकडे पालिका दुर्लक्ष करताना दिसत आहे.
ग्रामस्थ हैराण
सातारा: उडतारे (ता. वाई) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजेनतून रस्ता तयार करण्याचे काम दीड वर्षापूर्वी हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी रस्ता खोदून ठेवला आहे. मात्र काम पूर्ण होण्याची मुदत संत आली तरी जैसे थे आहे.
बघ्यांची गर्दी
सातारा : शहरातील ग्रेड सेपरेटरमध्ये शुक्रवारी दुपारी दुचाकीचा अपघात झाल्यानंतर त्यात युवक जखमी झाला असून, उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर बघ्यांची गर्दी झाल्याने ग्रेड सेपरेटरमध्ये वाहतूक कोंडी झाली होती.
मास्कचा विसर
सातारा : शासकीय तसेच खासगी कामासाठी असंख्य लोकांना साताऱ्यात यावे लागते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढत आहे. मात्र तरीही अनेकांना मास्कचा वापर करण्याचा विसर पडत आहे. तरी कोरोना वाढण्याची शक्यता आहे.
परिसरात दुर्गंधी
सातारा : नगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गोडोली साईबाबा मंदिर ते अण्णासाहेब कल्याणी विद्यालय रोडवर भद्रकाली दुकानासमोर गटाराचे पाणी रस्त्यावर येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हे दुखणे वर्षानुवर्षे कायम असून, स्थानिक वैतागले आहेत.
डोकेदुखी वाढली
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधित व मृतांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेळीच काळजी घेऊन स्वत:बरोबरच कुटुंबाचे रक्षण करावे, असे आवाहन केले आहे.