शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

राष्ट्रीय पातळीवर जादुटोणा विरोधी कायदा लागू करा, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीची मागणी 

By प्रगती पाटील | Published: July 03, 2024 7:37 PM

सातारा : उत्तरप्रदेश मधील हाथरस मध्ये शिवबाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाबाच्या सत्संगा वेळी झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये शंभर पेक्षा अधिक ...

सातारा : उत्तरप्रदेश मधील हाथरस मध्ये शिवबाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाबाच्या सत्संगा वेळी झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये शंभर पेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले. या बाबाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रीय पातळीवर जादुटोणा विरोधी कायदा लागु करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्यावतीने करण्यात आली आहे.हा स्वयंघोषित बाबा स्वतः देवाचा अवतार असल्याचे जाहीररित्या सांगत असतो. त्यामधूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याने भक्त गोळा केले आहेत. महाराष्ट्रात अंनिसच्या प्रयत्नातून झालेल्या जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत दैवी शक्तीचा दावा करणे आणि त्या द्वारे लोकांना फसवणे हा गुन्हा आहे. असाच कायदा देशभर लागू केला तर भोलेबाबाच्या सारख्या बाबांना आळा बसू शकेल असे देखील अंनिसने पत्रकात नमूद केले आहे.अशा स्वरूपाच्या घटनाच्या नंतर प्रत्यक्षात त्याला जबाबदार बाबा बुवा आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी हे नामानिराळे राहतात आणि काही प्याद्यांचा बळी दिला जातो हे लक्षात घेता सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली या घटनेची चौकशी व्हावी अशी देखील मागणी या पत्रकात करण्यात आली आहे. सर्व पक्षीय राजकीय नेते मतांच्या साठी अशा बाबा बुवांना पाठीशी घालतात ते थांबणे आवश्यक आहे असे अंनिसचे मत आहे. 

आज राज्यसभेत खा. मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या धर्तीवर जादूटोणाविरोधी कायदा देशभर लागू करण्याची मागणी केली आहे. सभापती धनकड यांनी देखील जादूटोणाविरोधी कायद्याच्या विषयी दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करून सदनाच्या पुढे मांडवी असे सांगितले आहे. ती स्वागतार्ह गोष्ट असल्याचेही पत्रकात नमूद केले आहे.हज यात्रा, अमरनाथ यात्रा अशा अनेक धार्मिक ठिकाणी दर वर्षी मोठ्या प्रमाणात लोकांचे मृत्यू होतात. लोकांनी देखील आपल्या श्रध्दा बाळगताना आपल्या आयुष्य आणि आरोग्य याची काळजी घेवून या पाळायला हव्यात असे आवाहन अंनिस वतीने मिलिंद देशमुख, डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, अण्णा कडलास्कर, नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे, फारुख गवंडी सम्राट हटकर, मुंजाजी कांबळे, प्रकाश घादगिने, प्रशांत पोतदार, मुक्ता दाभोलकर, विनोद वायंगणकर, अशोक कदम, प्रविण देशमुख यांनी केले आहे.

जादूटोणाविरोधी कायद्याच्या महाराष्ट्रातील गेल्या दहा वर्षांच्या अंमलबजावणी मध्ये सर्वधर्मीय बाबा बुवांच्या विरोधात गुन्हे दाखल होऊन त्यांना शिक्षा झाली आहे. त्यामुळे हा कायदा सर्वधर्मीय अंधश्रद्धा निर्मूलन करणारा असल्याचे सिद्ध झाले आहे. या कायद्याच्या गैर वापराची एकही घटना समोर आलेली नाही. त्यामुळे हा कायदा देशभर लागु करण्यात यावा. - डाॅ. हमीद दाभोलकर, अंनिस कार्यकर्ता

टॅग्स :Satara areaसातारा परिसर