शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

Satara: पन्नास हजारांची लाच घेताना बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 11:34 AM

वडूज : येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा उपविभागीय अभियंता जितेंद्र राजाराम खलिपे (वय ५१, सध्या रा. पेडगाव रोड, वडूज, ...

वडूज : येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा उपविभागीय अभियंता जितेंद्र राजाराम खलिपे (वय ५१, सध्या रा. पेडगाव रोड, वडूज, ता. खटाव, मूळ रा. उभी पेठ, विटा, ता. खानापूर, जि. सांगली) याला पन्नास हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी, यातील तक्रारदार यांनी पंचायत समितीच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत तीन रस्त्यांचे काम व एक समूह गांडूळ निर्मिती शेडचे, अशी एकूण चार कामे केली होती. ही कामे पूर्ण केल्याचा दाखला देण्यासाठी वडूजमधील उपविभागीय अभियंता जितेंद्र खलिपे याने तक्रारदार यांच्याकडे एकूण ३४ लाख रुपये बिलाच्या दोन टक्क्यांप्रमाणे ६८ हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ५० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने सातारा येथे लाचलुचपत विभागात जाऊन रीतसर लेखी तक्रार केली. त्या तक्रारीची अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता खलिपे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी दुपारी वडूज येथे सापळा लावण्यात आला. यावेळी खलिपे याला ५० हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. वडूज पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन राऊत, पोलिस निरीक्षक विक्रम पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक शंकर सावंत, हवालदार गणेश ताटे, पोलिस नाईक नीलेश चव्हाण, हवालदार नितीन गोगावले, महिला पोलिस नाईक प्रियांका जाधव, पोलिस कॉन्स्टेबल विक्रमसिंह कणसे, पोलिस नाईक मारुती अडागळे आदींनी ही कारवाई केली.

अनेक अधिकारी लाचलुचपतच्या रडारवर..!काही महिन्यांपूर्वी महसूल विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमध्ये दोन लिपिक जाळ्यात अडकले होते. तर आर्थिक ताळेबंद वर्षाअखेरीस जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा मोठा अधिकारी गळाला लागल्याने तालुक्यातील कंत्राटदारांकडून अनेक अधिकारी पैशांसाठी वेठीस धरतात. त्याचीच चर्चा दिवसभर वडूजमध्ये सुरू होती. त्यामुळे अनेक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस