मल्हारपेठ : ठोमसे, ता. पाटण येथे नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते भीमराव माने यांच्या पुढाकाराने ही शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये २० नागरिकांना काठी व दहा ग्रामस्थांना चष्मे वाटप करण्यात आले.
ठोमसे येथे आयोजित या शिबिरास दीपक कदम यांच्यासह ग्रामपंचायतीने सहकार्य केले. ग्रामपंचायत कार्यालयात शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये ५२ ग्रामस्थांचे डोळे तपासण्यात आले. चार ग्रामस्थांना शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. दहा नागरिकांना भीमराव माने यांच्या सहकार्याने चष्मे देण्यात आले. तर ग्रामपंचायत सदस्या बेबीताई काटकर यांच्या सहकार्याने वीस ग्रामस्थांना काठीचे वितरण करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक अशोक कोळी, सहायक फौजदार अमृत आळंदे, वैद्यकीय अधिकारी सुहेल शिकलगार, डॉ. विकास गरुड, निवास सुतार, संगीता माने, दयानंद शिलवंत, नीलेश शिलवंत आदींचा सत्कार करण्यात आला.