कऱ्हाड : खुबी, ता. कऱ्हाड येथील जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय ग्रामीण कायार्नुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांकडून वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी सरपंच मालती माने, उपसरपंच संजय काशीद, सोसायटीचे अध्यक्ष विशाल माने, ग्रामसेवक संतोष हंगवले, पोलीस पाटील नेताजी बनसोडे यांची उपस्थिती होती.
कृषी महाविद्यालयाचे पांडुरंग येसुगडे, संकेत माने, विशाल महाडिक, प्रज्योत चव्हाण, कौस्तुभ खोत, विनय मोहिते, ओमकार हरले तसेच इतर कृषिदूतांनी विविध जातींच्या वृक्षांचे रोपण केले. प्राचार्य बी. एस. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. सध्या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. यासाठी कृषी कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थी शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना वृक्ष लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. त्याचा फायदा सर्वांनाच असून कृषीविषयक अभ्यास तसेच समाजहित साध्य होत असल्याचे यातून दिसून येते, अशी प्रतिक्रिया खुबी येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
माजी सरपंच संदीप माने, बाळासाहेब माने, राजू सुतार, मोहन बनसोडे, अनिल जांगडे यांची उपस्थिती होती. माजी उपसरपंच कुबेर माने यांनी आभार मानले.
फोटो : २२केआरडी०३
कॅप्शन : खुबी, ता. कऱ्हाड येथे कृषिदूतांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच मालती माने, संजय काशीद, विशाल माने आदी उपस्थित होते.