विहे, ता.पाटण येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने तीन रूममध्ये २१ बेडचा सुसज्ज विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन तहसीलदार टोपे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. सरपंच दिनकर कुंभार, उपसरपंच अविनाश पाटील, सदस्य नितीन पाटील, विक्रम पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश पवार, पोलीस पाटील हिंमत पवार, मुख्याध्यापक सुभाष थोरात, ग्रामविकास अधिकारी शिवाजी चंदुगडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विहे ग्रामपंचायतीने विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांसाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये टीव्ही संचासह ग्रंथालय सुरू केले आहे. शेतीची मासिके व धार्मिक ग्रंथ उपलब्ध केले आहेत. फॅनसह ऑक्सिजन मशीन उपलब्ध केली आहे. ग्रामस्थांनी कक्षासाठी ५० कॉट स्वेच्छेने दिल्या आहेत. अशोक देसाई, रवींद्र पाटील, रवींद्र कदम, सूरज संकपाळ, सचिन यादव, हिंमत पाटील यांच्याकडून या कक्षास सहकार्य करण्यात आले.
फोटो : २९केआरडी०२
कॅप्शन : विहे, ता.पाटण येथील विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनानंतर तहसीलदार योगेश टोपे यांनी ग्रंथालयाची पाहणी केली. (छाया : सुनील साळुंखे)