फलटण : ‘क्रांतिसूर्य प्रतिष्ठान फलटण ही सामाजिक संस्था फलटण तालुक्यातील वंचित आणि गोरगरीब समाजातील लोकांचे जीवनमान उंचवावे आणि सर्व समाजाची प्रगती व्हावी, त्यांना मदत करता यावी या उदात्त हेतूने स्थापन करण्यात आली आहे,’ अशी माहिती क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी दिली.
येथील माळजाई उद्यानामध्ये क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्यावतीने वाचन संस्कृती वाढावी यासाठी महिलांना विविध पुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे संचालक प्रकाश इनामदार, शहाजी शिंदे उपस्थित होते.
नेवसे म्हणाले, ‘महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारावर आधारित क्रांतिसूर्य प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. या प्रतिष्ठानतर्फे विविध घटकांसाठी मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मोबाईलच्या जमान्यात वाचन संस्कृती लोप पावत आहे. हे चित्र बदलण्यासाठी आणि वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी क्रांतिसूर्य प्रतिष्ठानतर्फे दर्जेदार पुस्तके, साहित्य, ग्रंथ मोफत देत आहे.’
प्रकाश इनामदार यांनी आभार मानले. (वा. प्र.)
२३फलटण-नेवसे
फलटण येथे क्रांतिसूर्य प्रतिष्ठानतर्फे महिलांना पुस्तके वाटप केले. यावेळी अध्यक्ष मिलिंद नेवसे, प्रकाश इनामदार, शहाजी शिंदे उपस्थित होते.