शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

गोड द्राक्षाच्या चवीने युरोपीयन ग्राहकांना भुरळ, व्यापारी निमसोडच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 5:57 PM

दुष्काळ, अतिवृष्टी अन् त्यानंतर कोसळलेल्या अवकाळी पावसाने ह्यहोत्याचे नव्हते केले.ह्ण पण या संकटांसमोर न झुकता त्यावर मात करीत जिगरबाज शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागा फुलवल्या. गेल्या वर्षी याच बागांमधील गोड द्राक्षाच्या चवीने युरोपीयन ग्राहकांना भुरळ पाडली होती. त्यामुळेच यंदा युरोपातील अनेक व्यापाऱ्यांची पावले खटाव तालुक्यातील निमसोडच्या द्राक्ष शेतीच्या बांधांवर वळाली आहेत.

ठळक मुद्देयुरोपीयन व्यापारी निमसोडच्या बांधावरगोड द्राक्षाच्या चवीने युरोपीयन ग्राहकांना भुरळ

स्वप्नील शिंदे सातारा : दुष्काळ, अतिवृष्टी अन् त्यानंतर कोसळलेल्या अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते केले. पण या संकटांसमोर न झुकता त्यावर मात करीत जिगरबाज शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागा फुलवल्या. गेल्या वर्षी याच बागांमधील गोड द्राक्षाच्या चवीने युरोपीयन ग्राहकांना भुरळ पाडली होती. त्यामुळेच यंदा युरोपातील अनेक व्यापाऱ्यांची पावले खटाव तालुक्यातील निमसोडच्या द्राक्ष शेतीच्या बांधांवर वळाली आहेत.सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यात उन्हाळ्यात दरवर्षी पिण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. मात्र, काही शेतकरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून डाळिंब, द्राक्ष आणि इतर पिकांद्वारे आपली शेती फुलवली आहे. मायणी परिसरात तर द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. या परिसरात सुमारे ४१६ हेक्टरवर द्राक्षाचा बागा आहेत.यंदा मे महिन्यात दुष्काळामुळे पाणी टंचाई निर्माण झाली होती. अशावेळी शेतकऱ्यांनी ५० किलोमीटरवरून टँकरने पाणी विकत आणून बागा जगविल्या. अनेक गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली. तसेच शेततळी उभारून पाण्याची व्यवस्था केली. पावसाने दमदार हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने बागांची छाटणी केली; पण त्याच वेळी अवकाळी पाऊस पडल्याने बागांचे मोठे नुकसान झाले.संकटावर मात करण्याचा निर्धार करून शेतकरी कामाला लागले. पुन्हा बागा वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू करून तब्बल ४१७ जिगरबाज शेतकऱ्यांनी युरोप आणि आखाती देशांमध्ये द्राक्षाची निर्यात करण्यासाठी शासनाकडे नोंदणी केली.खटाव तालुक्यामध्ये पिकविल्या जाणाऱ्या द्राक्षाला युरोपामधील अनेक देशांमध्ये चांगली मागणी आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांशी करार करण्यासाठी व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधवर पोहोचले आहेत. त्यांनी बागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी प्राथमिक बोलणी केली आहे. त्यानंतर त्यांच्याशी करार केला जाणार आहे.

सध्या आफ्रिकेत द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. भारतातील द्राक्षाला युरोपात चांगली मागणी असून, येथील बागांची इतर देशांपेक्षा खटाव परिसरात चांगली निगा राखली जात आहे.- यॉन व्हॅन अ‍ॅडल, व्यापारी, नेदरलँड

टॅग्स :fruitsफळेSatara areaसातारा परिसर