शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

बंगला असूनही म्हणे... योजनेत घर देता का घर? घरकुलमध्ये धनदांडग्यांची नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 9:25 PM

आज खेडोपाडी असणारे जनावरांचे शेडही पाचटीच्या ताटीत राहिले नाही. गत पंधरा-वीस वर्षांत गावांचे चेहरे-मोहरे बदलले आहेत. मात्र, ‘फुकटचं घावलं अन् बाप ल्याक धावलं’ या म्हणीप्रमाणे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही पंतप्रधान

ठळक मुद्दे लाभार्थी वंचित राहण्याची भीतीगेली अनेक वर्षांपासून दारिद्र्य व गरजू घरकुल लाभार्थ्यांना घरे मिळाली आहेत

मल्हारपेठ : आज खेडोपाडी असणारे जनावरांचे शेडही पाचटीच्या ताटीत राहिले नाही. गत पंधरा-वीस वर्षांत गावांचे चेहरे-मोहरे बदलले आहेत. मात्र, ‘फुकटचं घावलं अन् बाप ल्याक धावलं’ या म्हणीप्रमाणे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही पंतप्रधान आवास घरकुल योजनेतील घरासाठी झुंबड उडाल्याचे चित्र पाटण तालुक्यातील गावोगावी दिसत आहे. मागणीसाठी पानभर याद्या गेल्या असून, गरजू लाभार्थी वंचित राहण्याची भीती सुज्ञ ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

गेल्या महिन्यापासून शासनाची घरकुल योजना ग्रामीण भागात चर्चेचा विषय बनली आहे. प्रत्येक गावात केलेली यादी पाहिली तर अधिकारीही बुचकळ्यात पडतायत. फुकटातील शासनाची योजना आहे तर अर्ज तरी करू या? मिळाली संधी तर मिळाली म्हणून अनेकांनी अर्ज केले आहेत. ग्रामपंचायत पदाधिकारी खऱ्या लाभार्थ्यांना वगळून आपल्या जवळचे कार्यकर्ते, भावबंदकीतील लोकांची नावे टाकून यादी पुढे देत आहेत.

घरकुल योजनेसाठी गेल्या महिन्यापासून गावोगावच्या याद्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन अनेक गावात घरे नसणाºया मंडळींच्या घरांचा सर्व्हे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अनेक गावांतील सरपंचांनी ग्रामसभा न घेता परस्पर याद्या तयार करून दिल्यामुळे गावोगावी एकच गोंधळ उडाला आहे. यादीत नाव नाही घातले तर अनेक लोक नाराज होत आहेत. नाव घालण्यास तुम्हाला पैसे पडत आहेत का ? त्याचे नाव आहे, मग आमचेही पाहिजे? अशी अनेक कारणे असल्यामुळे पदाधिकारी मंडळी गावात कुणाचा वाईटपणा घ्यायचा, म्हणून ज्यांची घरे सुस्थितीत आहेत, अशांचेही अर्ज केल्यामुळे मागणीचा आकडा फुगला आहे.

गेली अनेक वर्षांपासून दारिद्र्य व गरजू घरकुल लाभार्थ्यांना घरे मिळाली आहेत. मात्र गोरगरिबांना जाहीर केलेल्या शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी कार्यकर्ते व राजकीय मंडळी, ज्याच्या घरी दोनचाकी, चारचाकी वाहन, चांगले बांधकाम असणारे घर, ट्रॅक्टर असणाºयांची झुंबड उडाल्याचे दिसत आहे. कागदे रंगवून आजपर्यंत अनेकांनी योजना घेतल्याचे यानिमित्त बोलले जात आहे. लाभ घेणारी मंडळी शेतातील जनावरांच्या शेडचा किंवा जुन्या पडलेल्या घराचा फोटो देत आहेत.

वडिलांच्या नावावर घर असतानाही अनेकांनी रेशनिंग कार्डमध्ये नाव असल्यामुळे लग्न झालेल्या तरुणांनी घरांची मागणी केल्याचे चित्र दिसत आहे. एखाद्या योजनेचा लाभ घेतला असला तरी प्रत्येक येणारी योजना मलाही मिळावी, अशी मानसिकता ठराविक ग्रामस्थांची झाली आहे.

लाभ मागणीच्या याद्या पहिल्या की त्याचे प्रत्यंतर येते. नवीन घरकुल मिळणार आहे, म्हटल्यावर एका-एका घरातल्या दोघा-दोघांनी अर्ज दिले आहेत. दोन किंवा तीन भाऊ असल्यास एकाच घरात राहत असतील तर वडिलांच्या नावावर घर आहे आम्हाला घर नाही म्हणून मागणीसाठी बाप लेकांची झुंबड उडाली आहे. गावात कोणाचे नाव न टाकल्यास भांडणे होण्याची शक्यता असल्यामुळे मागणी करेल त्याची नावे टाकली गेली आहेत. सर्व्हेला आल्यानंतर बघू म्हणून गावपातळीवरील राजकीय मंडळींनी हात झटकल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे घरकुल योजनेपासुन मुळ लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.मानसिकता बदलणे गरजेचेशासनाने गरजू लोकांना घरकुल बांधण्यासाठी अनुदान दिले आहे. मात्र गावातील अनेक मंडळींच्या मानसिकतेसह लोभामुळे नावे यादीत घालत आहेत. फुकटचं घावलं अन बाप ल्याक धावलं या म्हणीप्रमाणे गावातून पान-पान याद्या गेल्या आहेत. कुणाला म्हणायचे नाव घालू नको. फुकट मिळेल, त्याकडे लोकांचा कल वाढला असून, लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे मत विविध गावचे पदाधिकारी, ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाSatara areaसातारा परिसर