सातारा : कास तलाव परिसरात शनिवारी सायंकाळी अज्ञातांकडून वणवा लावण्यात आला. ही घटना उघडकीस येताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी झाडाच्या डहाळ्यांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण आले. आग नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी जैविकदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या या परिसरात वणवा लागल्याने पर्यावरणप्रेमींमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कास तलाव व परिसरात पर्यटकांची सतत रेलचेल सुरू असते. शनिवारी सायंकाळी कास तलाव परिसराजवळीत जंगलात अज्ञाताकडून वणवा लावल्यात आला. हवेमुळे आग वेगाने पसरू लागली. ही घटना उघडकीस येताच कास पठार समितीचे कर्मचारी अभिषेक शेलार, प्रदीप शिंदे, सुजित जांभळे, विठ्ठल कदम, विजय बादापुरे, सीताराम बादापुरे, योगेश काळे यांनी आग आटोक्यात आणण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. कर्मचाऱ्यांनी सुरक्षेची कोणतीही साधणे नसताना केवळ झाडांच्या फांद्यांनी संपूर्ण आग नियंत्रणात आणली.
कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या आगीत मोठ्या प्रमाणावर वनसंपदा नष्ट झाली. कित्येक पशुपक्ष्यांचे निवारे नष्ट होऊन शेकडो टन चारा आगीत खाक झाला आहे. बहरण्यापूर्वीच शेकडो वृक्ष वणव्यात होरपळून गेले. हिरव्यागार वनराईने नटलेल्या परिसरात वारंवार वणव्याच्या घटना घडू लागल्याने पर्यावरणाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. विघ्नसंतोषी व्यक्तींवर अंकुश लावण्यासाठी वनविभागाने या परिसरात गस्त घालावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.
(कोट)
वणव्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. या परिसरात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर रानमेवा उपलब्ध होत असतो. हा रानमेवा विकून येथील शेतकरी उदरनिर्वासाठी अर्थार्जन करीत असतात; परंतु वणवे लागत असल्याने रानमेवा अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वणवा लागणार नाही, याची काळजी सर्वांनी घेऊन पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करावे.
- अभिषेक शेलार, कर्मचारी
कास पठार कार्यकारी समिती
फोटो : १७ सागर चव्हाण ०१ /०२
कास तलाव परिसरात शनिवारी सायंकाळी अज्ञातांकडून वणवा लावण्यात आला. वनकर्मचाºयांनी सुरक्षेची कोणतीही साधणे नसताना या आगीवर नियंत्रण मिळविले. (छाया : सागर चव्हाण)