शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पाडव्या दिनीही अजिंक्यतारा पेटला! अनेकांचा गैरसमज आग लावून जातो...

By प्रगती पाटील | Updated: April 9, 2024 20:11 IST

अजिंक्यताऱ्यासह यवतेश्वर, महादरे आणि भैरोबाचा पायथा या डोंगरांनी सातारा शहराला वेढले आहे. या परिसरात आढळणारी जैवविविधताही खास अशीच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मराठी नवीन वर्ष म्हणून एकीकडे शहरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र पुन्हा एकदा समाजकंटकांनी अजिंक्यतारा पेटवला. सायंकाळी चारच्या सुमारास अजिंक्यतारा डोंगराच्या पुर्वेस वणवा लागला आणि काही तासांतच तो वाढत दुसऱ्या टोकापर्यंत गेला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार घडल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

अजिंक्यताऱ्यासह यवतेश्वर, महादरे आणि भैरोबाचा पायथा या डोंगरांनी सातारा शहराला वेढले आहे. या परिसरात आढळणारी जैवविविधताही खास अशीच आहे. पण अंधश्रध्देतून डोंगरला आग लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. डोंगर जाळले तर जनावरांसाठी उत्तम प्रतीचे गवत पुढच्या वर्षी येते असा अनेकांचा समज आहे. त्यामुळे दिवाळीनंतर जरा उन पडू लागले की लोकं डोंगरात येऊन गवत कापून नेतात. आपल्या जनावरांसाठी पुरेशा गवताची तजवीज झाली की उर्वरित डोंगर जाळून टाकण्याची पध्दत गेल्या अनेक वर्षांपासून रूढ झाली आहे. याबाबत वनविभागाच्यावतीने वारंवार प्रबोधन करूनही नागरिकांची मानसिकता बदलत नाही. 

शहराच्या लगत असलेल्या डोंगरांमध्ये मात्र केवळ गंमतीचा भाग म्हणून वणवा लावला जातो. सहज फिरायला गेलेल्या युवांच्या टोळक्याकडून गंमत म्हणून गवत पेटवले जाते. काही जणांना रात्रीच्यावेळी हा नजारा पहायला आवडत असल्याचेही ते खासगीत सांगतात. युवांच्या या गंमतीचा दुरगामी परिणाम पर्यावरण आणि इथल्या जैवविविधतेवर होत असल्याने इथली जैव साखळीही अडचणीत येणयाची शक्यता वर्तवली जात आहे.

१. जनावरे तरी आहेत का?ग्रामीण भागात वणवा लावणाऱ्यांकडे चाैकशी केली की ते सर्रास जनावरांच्या चांगल्या चाऱ्यासाठी वणवा लावला असल्याचे नमुद करतात. गायी म्हशींसह बैलांसाठी वर्षभराचा चारा डोंगरावरूनच आणावा लागतो. त्यामुळे चांगल्या दर्जाचा चारा पाहिजे असेल तर डोंगर पेटवले पाहिजेत अशी सबब दिली जाते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामीण भागातूनही पशुधन लुप्त होऊ लागले आहे. ज्यांच्यासाठी डोंगर जाळला जातोय त्या पशुधनाची संख्या गावाकडेही रोडावली आहे. त्यामुळे डोंगरावर सध्या अस्तित्वात असलेले गवतही त्यांना पुरून उरतेय, अशी परिस्थिती आहे.

वणवा लावल्याने गवताबरोबरच अनेक छोटे जीव, किडे मुंग्या, पक्षी, त्यांची अंडी आणि सरपटणारे प्राणी जिवानीशी जातात. आग लागल्यामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही कमी होते. परिणामी डोंगर निसटणे, पाणी पूर्ण वाहून येणे हे धोके निर्माण होतात. यातून मातीचे होणारे नुकसान कधीही न भरून येणारे असे आहे.- सुनिल भोइटे, मानद वन्यजीव रक्षक

टॅग्स :fireआग