कºहाड : येथील कृष्णा घाटावर ये रातें ये मौसम, नदी का किनारा हा जुन्या आणि नवीन हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश पाटील, नगरसेवक घनश्याम पेंढारकर, सुधीर एकांडे, दिलीप घोडके, धनंजय खोत, अकबरभाई शेख, अर्शद नजीर मुजावर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
असिफ बागवान, कविता अगरवाल, अदिती कदम, मोहम्मद अनिस, डॉ. श्रीकृष्ण ढगे आदींनी चंद्र्रावरील विविध गाण्यांनी आपल्या सूमधूर आवाज आणि संगीताने रसिकांना मंत्रमुग्ध केले. संदेश लादे, सागर चव्हाण, जय पुरोहित आदींचे सहकार्य लाभले. रात का समा, चलो दिलदार चलो, चांदसा रोशन चेहरा, रूक जा रात यासारख्या गाण्यांना तर वन्समोअर मिळाला.
धकाधकीच्या जीवनात मानसाला विरंगुळा आणि दिलासा देण्याचे काम संगीतच करत असते. संगीतच जात, धर्म, गरीब, श्रीमंत असा कोणताही भेद न करता सर्व रसिकांना एका समान स्तरावर आणतो. आजही अनेक सदाबहार गायकांनी गायलेली गाणी कानावर पडली की, आपण भान हरपून जातो, असे मत यावेळी शेखर चरेगावकर यांनी बोलताना व्यक्त केले.