शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० गोळ्या झाडण्याचा अनुभव 
2
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
3
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
4
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
5
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
6
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
7
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
8
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
9
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
10
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
11
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
12
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
13
WhatsApp मेसेज न वाचताच ब्ल्यू टिक; मुलीच्या खोलीत छुपा कॅमेरा, 'अशी' झाली पोलखोल
14
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
15
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
16
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
17
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
18
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
19
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
20
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार

प्रत्येक घरात स्वावलंबी कुटुंब संकल्पना रुजणे गरजेचे

By admin | Published: July 09, 2015 10:52 PM

कामाचे विभाजन आवश्यकच : कुटुंबीयांनी घ्यावा सक्रिय सहभाग; ज्येष्ठांची जबाबदारी महत्त्वाची

प्रगती जाधव-पाटील -सातारा  : माझ्याशिवाय घराचं पान हालत नाही, हे अभिमानाने सांगण्याची गोष्ट नाही. याचा दुसरा अर्थ कुटुंबीयांना स्वावलंबी बनविण्यात अयशस्वी झाल्याचे भान महिलांनी ठेवले पाहिजे. ‘सुपर वुमन सिंड्रोम’ पासून दूर यायचं असेल तर ‘स्वावलंबी कुटुंब’ ही संकल्पना सत्यात उतरविणे आवश्यक आहे.घरातील पुरूषांनी किंवा मुलांनी महिलांच्या चौकटीतील कोणतेही काम केले की ते समाजाच्या दृष्टीने वर्ज्य असते. मित्र-मैत्रिणी कोणाच्याही आल्या तरी त्यांना काय हवे नको ते पाहणे हे काम केवळ स्त्रियांचेच असते, असा समज दृढ आहे. जोपर्यंत महिलांना मनुष्य म्हणून स्थान मिळणार नाही, तोपर्यंत त्यांच्यातील हा आजार हद्दपार होणार नाही.पती-पत्नी यांच्या सहचर्याने संसार सुरू होतो. निसर्गाने स्त्री-पुरूषाची निर्मिती करताना काही फरक केला नाही. पण लहान वयातच ‘मुलीसारखं रडायचं नाही’ ही शिकवण मुलांना मिळत असल्यामुळे रडण्याचं काम मुलींचेच असते, अशी मुलांची समजूत होते. अशाच गोष्टी मग पुढे आचरणात आल्यामुळे महिला आणि मुलींवर घरातील कामांची जबाबदारी पडते व मुलांना या कामांपासून दूर ठेवले जाते.सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मुलं, पती आणि घरातील ज्येष्ठांना जमेल ती कामे विभागून द्या. दुसरी, तिसरीतील मुलांना स्वत:चे स्वत: आवरायला सांगा. पतीलाही सगळ्या गोष्टी हातात देण्यापेक्षा वस्तू ठेवण्याची ठिकाणे दाखवून ठेवा. चहा आणि नाष्टा यांची जबाबदारी घरातील ज्येष्ठांना द्या. अशा जबाबदारी वाटण्यामुळे प्रत्येकजण स्वावलंबी होईल आणि कामाचा अतिरिक्त ताण कोणा एकावर पडणार नाही. कुटुंबीयांनीही एखाद्या दिवशी मिळून गृहिणीला सक्तीने विश्रांती घेऊ द्यावी. घरातील स्त्री जोपर्यंत अंथरूणाला खिळत नाही, तोपर्यंत तिच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष दिले जात नाही. सौजन्याने सर्व कामे स्वत:च्या खांद्यावर घेणाऱ्या महिलांनाही कधीतरी ‘ब्रेक’ हवा असतो याची जाणीव प्रत्येकानेच ठेवावी.आठवड्यातून तीन तास फक्त स्वत:साठीच!घर आणि नोकरी यांच्यात अडकलेल्या महिलांना आठवड्याची सुट्टीही मिळत नाही. त्यांच्या सुट्टीच्या दिवशी हमखास येणारे पाहुणे हे सुट्टीच्या आनंदावर विरजन टाकणारेच असतात. गृहिणी आणि नोकरदार महिलांनी आठवड्यातून किमान तीन तास तरी मनस्वी जगण्याचा आनंद घ्यावा. व्यक्ती म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या झुगारून देऊन मनाला समाधान होईल असे काही तरी करावे. यात त्यांनी कोणताही अपराधीपणाचा भाव ठेवू नये.बालवयातच भेदभावाला सुरुवातनवजात अर्भकाला कापडात गुंडाळून ठेवले तर मुलगा का मुलगी हे कोणीच सांगू शकत नाही. पण जसे ते मोठे होतात, तसे त्यांच्या पेहरावावरून त्यांच्यात फरक करायला सुरूवात होते. गुलाबी, पिवळा हे रंग मुलींचे होतात, तर काळा आणि लाल रंगांवर मुलांची मक्तेदारी येते. मुलींसाठी फ्रॉक आणि मुलांना पॅन्ट शर्ट हे अघोषितच होते. खेळण्यांच्या दुकानातही मुलींसाठी भातुकली आणि मुलांसाठी जेसीबी हा फरक पहायला मिळतो. चुकून एखादा मुलगा भातुकली खेळू लागला तर त्याच्यात काहीतरी दोष आहे, असा शिक्का मारून समाज रिकामा होतो. स्त्री-पुरूष भेदभाव बालवयात या पध्दतीने रूजविणे चुकीचे आहे.स्त्री-पुरूष समानतेचे कितीही गोडवे गायले तरीही पुरूषसत्ताक व्यवस्थेचे बळी महिला ठरणार आहेत. आपण कोणाकडे जेवायला गेलो तर महिलांनी ताट उचलून ठेवणे रूटीन आहे. पण एखाद्याने पुरूषाने ताट उचलून ठेवले तर हाहाकार माजतो. ए. ल. शारदा, पॉप्युलेशन फर्स्ट संस्था