खटाव : कोरोनाची लस ही सर्वांना मिळणार आहे. परंतु, त्याकरिता अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य विभाग व प्रशासकीय यंत्रणेकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून कोरोनाच्या या कठीण प्रसंगात सहकार्य करा, असे आवाहन पुसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मचले यांनी केले आहे.
खटावमध्ये सुरू असलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणास प्रारंभ झाला. त्या केंद्रास मंचले यांनी भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. लस मिळावी, याकरिता सर्वांचीच धडपड सुरू आहे. परंतु, या गडबडीत सोशल डिस्टन्सिंगचे भान विसरले जात आहे. सामूहिकरीत्या गर्दीमध्येच कोरोनाचा प्रसार होतो. हे प्रत्येकाने लक्षात ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
प्रत्यकाने ऑनलाईन नोंदणी करून खात्री करून मगच लसीकरण केंद्रात यावे. त्यामुळे गर्दी कमी तसेच गोंधळही होणार नाही. सर्वांनी प्रशासकीय यंत्रणेवर ताण येईल, असे न करता आपली सुरक्षितता पाळत सहकार्य करावे.
०३पुसेगाव
खटावमधील लसीकरण केंद्रास पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मंचले यांनी भेट दिली. याप्रसंगी राहुल पाटील उपस्थित होते. (छाया : नम्रता भोसले)