वाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर बहुतांश क्षेत्रात ह्यवर्क फ्रॉम होमह्ण सुरू झाले. याच धर्तीवर विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी ह्यएक्झामिनेशन फ्रॉम होमह्ण हा नावीन्यपूर्ण उपक्रम वाई तालुक्यात सुरू केला आहे. अनेक शाळा लर्निंग फ्रॉम होम, स्टडी फ्रॉम होम, हा उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राबवत आहेत.
आता या शिक्षणाचं मूल्यमापन व्हावं, सध्या शिकत असलेल्या इयत्तेमधील मूलभूत संबोध, महत्त्वपूर्ण घटक, उपघटक, अध्ययन निष्पत्ती, यांचं आकलन तथा दृढीकरण व्हावं आणि या साऱ्याचे मूल्यमापन व्हावे, या उद्देशाने गुगल क्लासरूम, टेस्ट मोन्झ, काहूट, झुम अॅप अशा काही तंत्रज्ञानाच्याद्वारे तालुक्यात पहिली ते नववी विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षांचे नियोजन केले आहे. या परीक्षा २४ ते ३० एप्रिल या कालावधीत होणार आहेत. यामुळे लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. त्यांची शैक्षणिक सलगता राहावी, सातत्य राहावं यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे.
यासाठी चार दिवस जवळपास सहाशे शिक्षकांशी मोबाईल व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी संवाद साधला आहे. आॅनलाईन परीक्षा घेण्याचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे. याकरिता तालुक्यातील अनेक तंत्रस्नेही शिक्षकांची, शिक्षक संघटनांची मदत होत आहे. अनेक पालक, ग्रामस्थ सरपंच यांच्याकडूनही या उपक्रमाचं कौतुक व स्वागत होत आहे,अशी माहिती गटशिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी दिली.तालुकास्तरावर हा पहिलाच उपक्रम होता. यावेळी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांनी सहभागी होऊन तांत्रिक मुद्दे मांडले. याचा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे.- संभाजी जाधव, मुख्यध्यापक, बोपर्डी आंतरराष्ट्रीय शाळाअनेक विद्यार्थ्यांना होणार फायदाकोरोनानंतर ह्यवर्क फ्रॉम होमह्णच्या धर्तीवर विद्यार्थी, शिक्षकांच्याकरिता ह्यएक्झामिनेशन फ्रॉम होमह्ण हा नावीन्यपूर्ण उपक्रम वाई तालुक्यात सुरू करण्यात आला आहे. अनेक शाळा ह्यलर्निंग फ्रॉम होमह्ण, ह्यस्टडी फ्रॉम होमह्ण हा उपक्रम माहिती आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने राबवत आहेत. यामुळे लॉकडाऊनमध्येही तंत्रज्ञानाच्या साह्याने तयार करून परीक्षा घेतल्याने विद्यार्थ्यांचा फायदा होईल,ह्ण असा विश्वास गटशिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी व्यक्त केला.