शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

अतिवृष्टीचा जावली तालुका पाण्यावाचून तहानलेलाच

By admin | Published: March 21, 2017 1:08 PM

प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष : २९ गावे टंचाईग्रस्त घोषित; ग्रामस्थ मात्र टँकरच्या प्रतीक्षेत

आॅनलाईन लोकमतसायगाव : सातारा जिल्ह्यात सर्वाधिक अतिवृष्टीचा तालुका म्हणून जावळीला ओळखले जाते. परंतु, पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळेच अधिक पाऊस पडूनही तसेच उशाला चार-चार धरणे असूनही जावळीकरांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे.तालुक्यातील ६८ गावांचे टंचाईग्रस्त म्हणून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी २९ गावांचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांनी मंजूर केले असल्याची माहिती तहसीलदार रोहिणी आखाडे-फडतरे यांनी दिली. जावळीत पाऊस अधिक प्रमाणात होतो. मात्र पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे हे पाणी डोंगरऊतारावरून वाहून जाते. पाणी आडवा पाणी जिरवा यासाठी शासनस्तरावरून नालाबंडिंग, पाणलोट विकास कार्यक्रम राबवले जात आहेत. मात्र जावळीत हे केवळ कागदावर दाखविण्याचा प्रयत्न गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांच्याकडून होताना दिसतो. आजतागायत तालुक्यात पाऊस कधीच कमी पडला नाही मात्र भीषण पाणी टंचाई भासणाऱ्या गावांची संख्या मात्र प्रत्येक वर्षी वाढताना आढळत आहे. तालुक्यात यावर्षी तर ६८ गावांमध्ये तसेच काही गावांमधील वाड्यावस्त्यांमध्ये पाणी-बाणी ची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर कहर म्हणजे तालुक्यातील अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवताना आढळत आहेत. दरवर्षी पाणी टंचाईची आढावा बैठक घेऊन केवळ कागदोपत्री उपाययोजना करण्यातच मश्गुल असलेल्या तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाणीटंचाई भासणार नाही, अशा पद्दतीने टंचाई निवारण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. तरच कुठे तरी पाणीटंचाई भासणाऱ्या गावांची संख्या कमी होईल, यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन शासकीय यंत्रणा कामाला लाऊन उन्हाळ्यातच यावर विचार करणे गरजेचे आहे.तालुक्यात सध्या पाणीटंचाईबाबत ६८ गावांचे प्रस्ताव आले आहेत. त्यापैकी २९ गावांना प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांनी मंजुरी दिली आहे. तर १४ गावांचे नवीन नळ पाणी दुरुस्ती प्रस्ताव मंजुरीसाठी, दोन गावांचे विहिरी खोल करण्याकरिताचे प्रस्ताव आले आहेत, अशी माहिती तहसीलदार रोहिणी आखाडे-फडतरे यांनी दिली.या २९ गावांमध्ये भीषण पाणीटंचाईतालुक्यातील केळघर, दूंद, कुसुंबी अंतर्गत बालदारवाडी, बेलोशी, वहागाव, कोळघर, बिभवी, तेटली, शेबडी, बामणोली कसबे अंतर्गत दंडवस्ती, मोहाट, केळघर तर्फ सोळशी, आसनी, दरेखूर्द अंतर्गत जावळेवाडी, भुतेघर (भुतेघरमुरा), बाहुळे, भोगवली, ओखवडी, दापवडी, मोरावळे-खामकरवाडी, करंजे (आनंदनगर), चोरांबे, कुरळोशी (वारनेवस्ती), गाढवली पुनर्वसीत, डांगरेघर, केंजळ, निपाणी (अंतर्गत वाड्या), बेलावडे (बौद्धवस्ती), या भीषण पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या २९ गावांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. यावर्षी कोणत्याही गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. त्यादृष्टीने ज्या गावात पाणीटंचाई आहे अशा गावांनी प्रस्ताव द्यावेत तात्काळ अशा गावांना पाणी पुरवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. व प्रत्येकाला पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून दिले जाईल.- दत्ता गावडेउपसभापती