लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : येथे शिवप्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त होणाºया दुर्गामाता दौडची शनिवारी विजयादशमीदिवशी सांगता झाली. यावेळी ३२ मण सुवर्ण सिंंहासन योजनेस अज्ञात व्यक्तीने ११ लाख १ हजार १११ रुपयांचा धनादेश दिला तर भवानी तांडव ढोल पथकाने आर्थिक मदत केली.कºहाड येथे दुर्गा दौड सांगता प्रारंभप्रसंगी शस्त्र पूजन कºहाड अर्बन बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, नगराध्यक्षा रोहणी शिंंदे यांच्या हस्ते करण्यात आले. दौड सुरू होण्यापूर्वी महारुद्र ढोल पथकाने सलामी दिली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक सागर आमले, ओमकार माने, केदार डोईफोडे, श्रीकृष्ण पाटील, नगरसेवक घनश्याम पेंढारकर, हणमंतराव पवार, प्रताप साळुंखे, अॅड. विजय पाटील, विजयराव जोशी यांच्यासह शिवप्रेमींची उपस्थिती होती.नवरात्रच्या कालावधीत शिवप्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गावोगावी दुर्गा दौडचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही त्याचे आयोजन करण्यात आले होते. कºहाडातील दैत्यनिवारणी मंदिरापासून दररोज सकाळी ही दुर्गादौड मार्गस्थ होत होती. शाहू चौक, दत्त चौक, आझाद चौक, चावडी चौक, कन्या शाळा, विजय दिवस चौकमार्गे दत्त चौकात या दौडची सांगता केली जात होती. शनिवारी या दौडचा सांगता समारंभ घेण्यात आला. शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक सागर आमले यांनी प्रास्ताविक केले.
कºहाडात ‘दुर्गा दौड’ची उत्साहात सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 11:01 PM