उदयसिंह थोरात, बाबा शामराव पवार, कृष्णतराव थोरात, प्रा. सुनील थोरात, रघुनाथ थोरात, सदाशिव सुतार, सदाशिव थोरात, रामचंद्र थोरात, महादेव थोरात, आकाराम थोरात, बी. वाय. थोरात, अशोक जंगम, वासुदेव थिटे, सुभाना तडाखे, विष्णुपंत थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अनुभूती ट्रस्टतर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘कला तपस्वी’ पुरस्कार प्रसिद्ध चित्रकार बाबा शामराव पवार यांना उदयसिंह थोरात यांच्या हस्ते देण्यात आला. या महोत्सवात नवोदित कलाकारांनी आपले शास्त्रीय गायन सादर केले. वर्षा कुंभार हिने राग वृंदावनी सारंग सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच विनायक साठे यांनी राग पुरिया धनश्री, महेश साठे यांनी राग गौडसारंग, यशराज शेवाळे यांनी राग मुलतानी तसेच प्रथमेश लाड यांनी बासरी वादनात राग सरस्वती व पहाडी रागाचे सादरीकरण केले. या सर्वांना तबला साथ मयूर जोशी यांनी केली. या संगीत सभेची सांगता प्रथमेश लाड यांनी भैरवी सादर करून केली. या महोत्सवाचे निवेदन व आभार महेश साठे यांनी मानले.
फोटो : ३०केआरडी०२
कॅप्शन : कालवडे (ता. कऱ्हाड) येथे आयोजित गुरुसेवा संगीत महोत्सवात ‘कला तपस्वी’ पुरस्कार प्रसिद्ध चित्रकार बाबा शामराव पवार यांना उदयसिंह थोरात यांच्या हस्ते देण्यात आला.