कराड येथे साईसम्राट शिक्षण संस्थेत रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी धैर्यशील पाटील बोलत होते. यावेळी शेफ सम्राटसिंह पाटील, प्रा. विजय जाधव, विलास झाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
धैर्यशील पाटील म्हणाले, प्रभू राम आदर्श पुत्र, आदर्श पिता, आदर्श बंधू, आदर्श पती होते म्हणूनच जगभरात त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून संबोधले गेले. स्वतःकडे असणारे अधिकार व जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण कसे उत्तम प्रकारे करायचे याचा वस्तुपाठ प्रभू रामांनी घालून दिला.
सम्राटसिंह पाटील म्हणाले, पुरुषोत्तम प्रभू रामाचे चरित्र नवीन पिढी व देश घडवण्यास मदत करत आहे. रामराज्यात सुख-शांती व समाधानाला प्राधान्य होते. लोभ, राग, मत्सर यांना स्थान नव्हते.
कोरोना संकटामुळे साईसम्राट इन्स्टिट्यूट व सुपर्ब चहाचे मोजके कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.(वा.प्र.)
फोटो :कराड येथे साईसम्राट शिक्षण संस्थेत रामनवमी उत्सव प्रसंगी संस्थेचे विश्वस्त धैर्यशिल पाटील, संग्रामसिंह पाटील,प्रा. विजय जाधव व इतर