कºहाड : करणी उतरविण्याच्या नावाखाली बोकड, कोंबड्यांचे बळी देऊन भाविकांना प्रत्येकी २५ ते ३० हजाराला गंडा घालणाऱ्या भोंदूला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. ओंड, ता. कºहाड येथे साताºयाची स्थानिक गुन्हे शाखा, कºहाडच्या पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे पथक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संयुक्तपणे ही कारवाई केली.शंकर भीमराव परदेशी (वय ५५, रा. ओंड) असे पोलिसांनी अटक केलेल्या भोंदूचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कºहाड तालुक्यातील ओंड येथे शंकर परदेशी हा भोंदुगिरी करून भाविकांची लुबाडणूक करीत असल्याची तक्रार सुनील काळे (रा. चरण, ता. शाहूवाडी) या भाविकाने अंनिसकडे दिली होती. त्यानुसार अंनिसच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वी दोन ते तीनवेळा ओंड येथे जाऊन खात्री केली. त्यावेळी शंकर परदेशी हा त्याच्या राहत्या घरातच भाविकांचा दरबार भरवून भोंदुगिरी करीत असल्याचे समोर आले. त्यामुळे अंनिसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याबाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या सूचनेनुसार सातारची स्थानिक गुन्हे शाखा आणि कºहाडचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रविवारी सकाळी ओंड येथे सापळा रचला.रविवारी सकाळी अंनिसचे काही कार्यकर्ते भाविक बनून आपल्या अडचणी सांगत परदेशीच्या दरबारात गेले. त्यावेळी अन्य काही भाविक त्याठिकाणी होते. प्रत्येकजण आपली व्यथा मांडत होता. त्यावर भोंदू शंकर परदेशी हा उतारा सांगायचा. तसेच अनेकांना त्याने बकरे आणि कोंबड्याचा बळी द्यावा लागेल, विधी करावा लागेल, असे सांगितले. अंनिसच्या कार्यकर्त्यांनाही त्याने करणी झाल्याचे सांगत ती उतरविण्यासाठी उदगिरी, जि. कोल्हापूर येथील जंगलात विधी करण्याचा सल्ला दिला. शंकर परदेशी हा भोंदुगिरी करीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले. कºहाड तालुका पोलिसांत त्याच्यावर नरबळी व इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादुटोणी प्रतिबंध व उच्चाटन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.वीस वर्षांपासून भोंदुगिरीचा बाजारओंड येथे शंकर परदेशी याने सुमारे वीस वर्षांपासून भोंदुगिरीचा बाजार मांडला होता. दररोज अनेक भाविक त्याच्याकडे येत होते. या भाविकांसाठी तो घरातच दरबार भरवायचा. घरातील देव्हाºयासमोर तो सर्वांना बसवायचा. एकेकाची समस्या ऐकून घेण्याचा बहाणा करीत तो उतारा सांगायचा. तसेच प्रत्येकाकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्याचा त्याचा प्रयत्न असायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली.सोन्याच्या अंगठ्यांसह ढीगभर साड्याभोंदू शंकर परदेशी याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना कमी-अधिक वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या तसेच ढीगभर साड्या आढळून आल्या. संबंधित साड्या देवासाठी म्हणून तो भाविकांकडून मागून घ्यायचा. तसेच सोन्याच्या अंगठ्याही त्याने भाविकांकडूनच घेतलेल्या असाव्यात, असा पोलिसांचा कयास आहे.हळद-कुंकवाने माखलेल्या नोटाशंकर परदेशी याच्याकडून पोलिसांनी ३९ हजार ३०५ रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने, पोषाख, जादुटोण्याचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत केला. परदेशकिडे जी रोकड आढळली, त्यामध्ये अनेक नोटा हळद आणि कुंकवाने माखलेल्या आढळल्या. पूजेच्या नावाखाली त्याने ते पैसे भाविकांकडून उकळले असावेत, असा पोलिसांचा कयास आहे.व्याजाने पैसे घेऊन भोंदूला दिलेकाही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील चरण येथील सुनील विश्वास काळे यांनी आपल्याला कामधंदा मिळण्यासाठी व घरातील अडचण दूर होण्यासाठी ओंड येथे येऊन शंकर परदेशी याच्याकडे गाºहाणे मांडले. त्यावेळी भोंदू परदेशी याने देवाचं भागविण्यासाठी सुनील काळे यांच्याकडून दहा हजार रुपये घेतले. काळे यांनी ते पैसे लोकांकडून व्याजाने पैसे जमा केले होते. मात्र, या पैशातून परदेशीने केलेल्या पूजाविधीचा कोणताही फायदा होत नसल्याचे जाणवल्यामुळे सुनील काळे यांनी याबाबत अंनिसकडे तक्रार केली.कारणे अनेक;पण उतारा एकदैवी चमत्काराचा दावा करून स्वत:कडे दैवी शक्ती असल्याची बतावणी शंकर परदेशी करीत होता. तसेच घरात रेणुकादेवीचा दरबार भरवून तो फसवणूक करत होता, असे पोलीस तपासातून समोर आले आहे. नोकरीसाठी घरगुती अडचण दूर होण्यासाठी, कामधंदा मिळण्यासाठी, लग्न जमविण्यासाठी, जमिनीचा वाद मिटवण्यासाठी अशा विविध कारणांनी आलेल्या लोकांना भोंदू बाबाने लाखोंचा गंडा घातला. त्याच्याकडे येणाºया लोकांची वेगवेगळी कारणे असली तरी दोन कोंबडे व एक बोकड असा एकच उपाय सांगून तो फसवणूक करत होता.
‘करणी स्पेशालिस्ट’ भोंदूचा पर्दाफाश..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 11:52 PM