शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

दारूबंदीची परंपरा बाहेरच्या विक्रेत्यांनी मोडली !

By admin | Published: February 13, 2015 12:18 AM

गोपूज : व्यवसाय तेजीत अन् पोलिसांचे मात्र दुर्लक्ष

औंध : गोपूज, ता. खटाव येथे खुलेआम दारूविक्री सुरू आहे. या परिसरात दारूचा उघडपणे व्यवसाय सुरू असताना पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेत त्याकडे दुर्लक्ष केले आहे. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, येथील दारूबंदीची परंपरा बाहेरील लोकांनी मोडीत काढली आहे. गोपूज येथे रहदारीचे मोठे प्रमाण आहे. लोकांची ये-जा ही अधिक असते. या ठिकाणी व परिसरात जवळपासच्या खेड्यापाड्यातील काहीनी दारू विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दारूबंदीची परंपरा असणाऱ्या या गावात बाहेरील लोकांनी ही परंपरा तोडली आहे. त्यामुळे या दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त करायचा कसा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. मागील महिन्यात २६ जानेवारीला ग्रामसभा झाली होती. त्यावेळी ग्रामस्थांनी दारूबंदीसाठी कारखाना परिसरातील दारू विक्रेत्यांना चोप देण्याचे ठरविले होते. परंतु, लोकांचा मोर्चा आपल्याकडे येत आहे, हे पाहताच विक्रेत्यांनी पळ काढला होता. त्यानंतर दोन दिवस शांत राहण्याची भूमिका घेतली आणि पुन्हा त्यांनी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. गोपूज ग्रामस्थांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. दारूविक्री बंद करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक पावले उचलली आहेत. त्यांना सर्वांची साथही आहे. गोपूज व परिसरातील अवैध दारू विक्री दोन दिवसांत बंद करावी. याबाबत निर्णय न झाल्यास पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना भेटणार आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.