शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

महावितरणच्या नवप्रकाश योजनेला जुलै २0१७ पर्यंत मुदतवाढ

By admin | Published: March 11, 2017 12:51 PM

शंभर टक्के व्याज व विलंब आकाराची रक्कम माफ होणार

महावितरणच्या नवप्रकाश योजनेला जुलै २0१७ पर्यंत मुदतवाढसातारा : थकित वीज देयकांमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या सार्वजनिक नळयोजना ग्राहक वगळून इतर सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुरू असलेल्या नवप्रकाश योजनेला येत्या ३१ जुलै २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.मुदतवाढ मिळालेल्या नवप्रकाश योजनेनुसार आता येत्या ३० एप्रिल २०१७ पर्यंत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास शंभर टक्के व्याज व विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे. याआधी ही मुदत ३१ जानेवारी २०१६ पर्यंत होती. तसेच १ मे ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत मूळ थकबाकीसह व्याजाची २५ टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ७५ टक्के व्याज व शंभर टक्के विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे.या योजनेत दि. ३१ मार्च २०१६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषिपंपधारक, घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक तसेच इतर वर्गवारीतील (सार्वजनिक नळयोजना ग्राहक वगळता) वीजग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय लोकअदालत किंवा न्यायप्रविष्ट असलेल्या थकबाकीच्या प्रकरणातील थकबाकीदारांना सहभागी होता येणार आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणात हुकूमनामा मंजूर होऊन १२ वर्षांपेक्षा अधिक झाली असल्यास अशा ग्राहकांनाही या योजनेत सहभागी होता येईल.मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा करण्यासाठी महावितरणच्या संकेतस्थळावर आॅनलाईन सोय असून, संबंधित ग्राहकांच्या थकित देयकांची व किती रक्कम भरायची याबाबत माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनेत सहभाग घेऊन थकबाकीमुक्त झालेल्या वीजग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरित नवीन वीजजोडणी देण्यात येत आहे. त्यासाठी सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमधून सूट देण्यात येत आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर संबंधित ग्राहकांच्या थकित देयकांची व किती रक्कम भरायची याची माहिती उपलब्ध आहे. ही रक्कम आॅनलाईनसह धनादेशद्वारेही भरता येणार आहे. याशिवाय महावितरणच्या शाखा ते मंडल कार्यालयांत नवप्रकाश योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना थकबाकीच्या रकमेचा तपशील तातडीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. (प्रतिनिधी)